Budh Rashi Parivartan In Mithun SAAM TV
लाईफस्टाईल

Surya Budh Gochar in Mithun : सूर्य संक्रमणामुळे बुधादित्य राजयोग ! या ३ राशींच्या लोकांना होईल धनलाभ, मिळतील नोकरीच्या अनेक संधी

Surya in Mithun Rashi : सूर्य हा दर महिन्याला राशीत संक्रमण करतो. तर बुध हा अगदी कमी वेळात राशीत बदल करतो.

कोमल दामुद्रे

Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला प्रत्येक ग्रह आपली दिशा बदलत असतो. याच्या परिवर्तनामुळे आपल्याला चांगले व वाईट अशा दोन्ही स्वरुपाची फले प्राप्त होतात. तर सूर्य हा दर महिन्याला राशीत संक्रमण करतो. तर बुध हा अगदी कमी वेळात राशीत बदल करतो.

या महिन्याच्या १५ जूनला सूर्याने मिथुन (Mithun) राशीत प्रवेश केला तर २४ जूनला बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या संक्रमणामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. मिथुन राशीत तयार झालेला हा बुधादित्य राजयोग सर्व राशींच्या आयुष्यावर परिणाम करेल. तर या ३ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. वृषभ

या राशीसाठी बुधादित्य राजयोग विशेष फल देणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नात वाढही होईल. अडकलेले पैसे (Money) मिळू शकतात. तुमचे स्थान व प्रभाव वाढेल. माध्यन, लेखन व नवीन गोष्टींसाठी हा काळ अधिक उत्तम आहे. नोकरदारांसाठी हा काळ शुभ असेल.

2. मिथुन

मिथुन राशीत सूर्य व बुध संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. यामुळे अनेक लाभ होतील. या राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. संवाद कौशल्य चांगले होईल. नोकरी (Job) -व्यवसायात प्रगती होईल. पैशांचे अनेक नवे मार्ग खुले होतील. जीवनसाथीबरोबर चांगले नाते तयार होईल.

3. तूळ

बुधादित्य राजयोगामुळे या राशीला अनुकूल परिणाम मिळतील. नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. यश प्राप्त होईल. पदोन्नती व वेतनवाढ होईल. नवीन कामे सुरु कराल. महत्त्वकांक्षा पूर्ण कराल. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम होण्याची शक्यता

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi Sai Sansthan : साई मंदिर सुरक्षेसाठी आता AI चा वापर; साई संस्थानला तातडीने मिळणार गुन्हेगारांचा अलर्ट, डेटा होणार संग्रहित

Saiyaara OTT Release: थिएटर गाजवल्यानंतर अहान पांडे आणि अनीत पड्डाचा 'सैयारा' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Mumbai Metro 2: डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार, ५.३९ किमीचा मार्ग अन् ५ स्थानके; कधीपासून सुरू होणार?

बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा जीआर अडचणीचा ठरणार, फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनाच शंका; जरांगेंनाही सुनावलं

SCROLL FOR NEXT