Food yandex
लाईफस्टाईल

Superfoods for Diabetes: मधुमेह रुग्णांसाठी 'हे' पदार्थ ठरतील वरदान, ब्लड शुगर होईल कमी

Superfoods for Diabetes Patients: मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी शारीरिक हालचाली आणि धकाधकीची जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत. तुमच्या कुटुंबातील एखाद्याला मधुमेह असेल किंवा तुम्ही स्वतः या आजाराशी झुंजत असाल तर आम्ही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत (Best Foods For Diabetes) ज्यांचा आहारात समावेश करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते आणि शरीरातील अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता देखील पूर्ण करता येते.

कारले

कारल्यामध्ये असलेल्या काही घटकांमुळे ते शरीरात इन्सुलिनसारखे काम करते. इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले खूप फायदेशीर आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट देखील आढळतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

कडुलिंब

आयुर्वेदात, कडुलिंब हे वर्षानुवर्षे अनेक रोगांवर औषध मानले गेले आहे. कडुलिंब मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. याशिवाय, ते शरीराची इन्सुलिनच्या प्रति संवेदनशीलता देखील वाढवते. जे मधुमेहामध्ये खूप महत्वाचे आहे.

आवळा

आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही . यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय आवळ्यामध्ये आढळणारे काही घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये समाविष्ट असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात आणि पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासही खूप मदत करतात.

दालचिनी

दालचिनी हा केवळ मसालाच नाही तर मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी घरगुती उपाय देखील आहे. यामध्ये आढळणारे घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, ते पेशींची इन्सुलिनची संवेदनशीलता देखील वाढवते. ज्यामुळे शरीर रक्तातील साखरेचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकते. हे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकते.

फ्लॅक्स सीड्स

फ्लॅक्स सीड्स मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहेत. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावते. या बियांचा आहारात समावेश केल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय फ्लॅक्ससीडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT