Sunlight Benefits, Skin Care Tips
Sunlight Benefits, Skin Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Sunlight Benefits : व्हिटॅमिन 'डी' साठी कोवळ्या उन्हात बसा, त्वचेसोबत आरोग्यासाठी होतील अनेक फायदे !

कोमल दामुद्रे

Sunlight Benefits : दिवसभर कामाच्या व्यापामुळे आपल्याला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या (Health) समस्यांना सामोरे जावे लागते.

जीवनसत्त्वांच्या (Vitamins) कमतरतेमुळे आपल्याला हाडे कमकुवत होणे, त्वचेचे विकार, अशक्तपणा, स्नायूंचे दुखणे यांसारख्या अनेक आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. यांची कमतरता भरून काढण्यासाठी आपण सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला हवे.

सकाळचा पहिला सूर्यप्रकाश शरीरासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये जीवनसत्त्व ड आढळते. जे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.

सकाळी फक्त ३० मिनिटे सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर मानला जातो. सूर्यप्रकाशात अनेक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या संसर्गाचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते.

उन्हात बसल्याने शरीरात पांढऱ्या रक्त पेशींची पुरेशी निर्मिती होते, जी रोग निर्माण करणाऱ्या घटकांशी लढण्याचे काम करतात आणि आपल्याला तंदुरुस्त ठेवतात. चला तर मग सकाळच्या सूर्यप्रकाशाचे काही फायदे पाहूयात.

सूर्यप्रकाशाचे फायदे -

१. सूर्यप्रकाशात गेल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच सर्दी, खोकला, ताप आणि हंगामी रोगांपासून आराम मिळतो.

२. सूर्यप्रकाशात गेल्याने शरीराला ९० टक्के जीवनसत्त्व ड मिळते. हे स्नायू आणि हाडे यांना सामर्थ्य देते. यामुळे सांध्यामध्ये आणि शरीराच्या इतर भागांमध्ये होणारा त्रास कमी होतो.

३. शरीराला सूर्यप्रकाश मिळाल्याने मेटाबॉलिज्म चांगले होते. हे वजन कमी करण्यास मदत करते. एका संशोधनानुसार, सूर्यकिरण आणि बीएमआयमध्ये खोल संबंध आहे. यामुळे वजन नियंत्रित राहते.

४. ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या आहे. त्यांनी सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. सूर्यप्रकाशाने शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन्स वाढतात. रात्री झोप न येण्याच्या समस्येवर मात केली जाते.

५. दिवसभर काही मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्यास शरीरात असणारे बॅक्टेरिया दूर होतात. यामुळे मुरुम, डाग, जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम मिळते.

६. सूर्यप्रकाशापासून शरीराला पोषण मिळते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे निरोगी हृदयामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

७. हिवाळ्यात थंडीमुळे शरीर योग्य प्रकारे कार्य करण्यास सक्षम नसते, यामुळे सूर्यप्रकाश घेणे फायदेशीर आहे. यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि शरीर योग्यरित्या कार्य करते.

८. ज्या लोकांना बद्धकोष्ठता समस्या आहे. त्यांना सूर्यप्रकाशाचा फायदा होतो. पाचक प्रणाली बळकट होते यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

९. सूर्यप्रकाश घेतल्यास शरीरातील पांढर्‍या आणि लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते. सूर्यप्रकाशाने मेंदूच्या पेशी चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. अशावेळी मेंदू निरोगी राहतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT