Space Mission Health Effects Saam TV
लाईफस्टाईल

Space Mission Health Effects: अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतो? सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबाबत नासाने दिली महत्वाची माहिती

Ruchika Jadhav

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना २ जून रोजी नासाने एका स्पेस मिशनसाठी अंतराळात पाठवले होते. हे मिशन फक्त एक आठवड्याचे होते, मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही अंतराळवीर तेथेच अडकून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुनीता विल्यम्स येथे असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत नासाने देखील एक अहवाल दिला आहे. नासाच्या अहवालानुसार, फेब्रुवारी २०२५ पूर्वी दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत. काही डॉक्टर आणि तज्ञांच्या मते बरेच दिवस अंतराळात राहिल्याने त्यांच्या डीएनएला धोका पोहचण्याची शक्यता आहे.

दीर्घकाळ अंतराळात राहणे माणवी आरोग्यासाठी हिताचे नाही. यामुळे अनेक आजार जडू शकतात. त्यामुळे शरीरात बरेच बदल होतात. आता सुनीता विल्यम्स अंतराळात राहिल्याने त्यांना कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात याची माहिती जाणून घेऊ.

स्पेस अॅनिमिया

अंतराळात जास्त वेळ राहिल्याने शरीरातील द्रव्यपदार्थ कमी होत जातो आणि काही काळानंतर रक्तातील लाल पेशी सुद्धा कमी होतात. स्पेस रेडिएशनचा प्रभाव थेट लाल रक्तपेशींवर होताना दिसतो. तज्ज्ञ सांगतात की, पृथ्वीवर एका व्यक्तीच्या शरीरात सुमारे २० लाख लाल रक्तपेशी तयार होता आणि नष्ट सुद्धा होतात. मात्र स्पेसमध्ये हे प्रमाण ३० लाखांवर असते. त्यामुळे येथे राहणाऱ्या व्यक्तीला स्पेस अॅनिमिया होण्याचा धोका असतो.

कर्करोग होण्याची शक्यता

अंतराळात फार कमी गुरुत्वाकर्षण असते. त्यामुळे हृदय सुद्धा योग्य पद्धतीने काम करत नाही. स्पेस रेडिएशनचा प्रभाव हृदयावर सुद्धा होतो. त्यानेच कर्करोग होण्याची शक्यता असते.

डीएनएमध्ये असमानता वाढते

तज्ज्ञांनी यावर असं म्हटलं आहे की, अंतराळातील रेडिएशनमध्ये जास्त ऊर्जा असते. त्यामुळे रेडिएशन थेट व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर डीएनए स्ट्रेंड तुटतात. याने तुम्हाला अनुवांशिक असमानता सुद्धा जाणवते. तसेत मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा मोठा परिणाम होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT