महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
Maharashtra Assembly Elections 2024 : महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. त्याचा फायदा मराठा समाजाला होतोय, असे वक्तव्य मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. मराठा समजाला आरक्षण देताना कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलेय.
मनोज जरांगेंनी माघार घेतली, पण त्यांचा प्रभाव, महायुतीची भूमिका काय?
एकनाथ शिंदे म्हणाले, आमची भूमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. आरक्षण दिलं पाहिजे. पण ओबीसी किंवा अन्य समाजाचे आरक्षण कमी करुन नाही. आम्ही विशेष अधिवेशन घेतलं. दहा टक्के आरक्षण दिले. त्याचा फायदा मराठा समाज घेतोय. कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती. त्यासाठी आम्ही शिंदे समिती गठीत केली. कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले.
देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. हायकोर्टात टिकले. पण राज्यात सरकार बदलल्यानंतर ते टिकले नाही. हे मविआ सरकारचे अपयश आहे. मागसवर्गीय आयोगाकडून आलेल्या सूचनानुसार आम्ही काम केले, त्याच्या आधारावर आम्ही दहा टक्के आरक्षण दिले. ज्यांनी द्यायला पाहिजे, त्यांनी दिले नाही. वंचित ठेवलेय. त्यांनी फक्त राजकारण केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.