Talcum Powder
Talcum Powder  Saam Tv
लाईफस्टाईल

Talcum Powder : थांबा! उन्हाळ्यात घामोळ्यांसाठी टॅल्कम पावडरचा वापर करताय? जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

कोमल दामुद्रे

Talcum Powder Overuse :

उन्हाळा सुरु झाला की, आपण घामामुळे वैतागलेले असतो. त्यामुळे आपल्या घामोळ्यांचा सामना करावा लागतो. आपल्या त्वचेवर पुरळ, रॅशेस आणि खाज लागू लागते. अशावेळी आपण पावडरचा वापर करतो.

हल्ली बाजारात मौसमनुसार पावडर येतात. पण उन्हाळ्यात वापरला जाणारा टॅल्कम पावडर अनेकांना माहित आहे. हा पावडर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण वापरतात. याचा वापर केल्याने आपल्याला काही प्रमाणात बरे वाटते पण त्वचेवर (Skin) याचा परिणाम होतो.

टॅल्कम पावडर आपल्या शरीरातील घाम शोषून घेते. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. जर हे दिवसभर शरीराला चिकटून राहिले तर त्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि पुरळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया याचा परिणाम आरोग्यावर (Health) कसा होतो.

1. कोरडेपणा

टॅल्कम पावडर आपण शरीरावर सतत लावल्याने त्वचा कोरडी पडू शकते. ही समस्या वाढून रॅशेस येऊ शकतात. हा पावडर त्वचेच्या छिद्रात अडकतो ज्यामुळे श्वास घेण्याची संधी मिळत नाही.

2. धाप लागणे

अनेकजण चेहऱ्यावर टॅल्कम पावडर लावतात. यामुळे श्वसनाच्या समस्यांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये एस्बेस्टोस आढळून येते. जे श्वासाद्वारे शरीरात गेल्याने दम्याचा धोका वाढतो.

3. मुरुमांची समस्या

चेहऱ्यावर सतत टॅल्कम पावडरचा वापर केल्याने घाम बाहेर पडू शकतो. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचून मुरुमांची समस्या निर्माण होते. ज्यामुळे मुरुमांची समस्या होते.

4. त्वचेवर पुरळ येणे

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी घाम येणे खूप महत्त्वाचे आहे. पण जर आपण सतत टॅल्कम पावडरचा वापर करत असू तर घाम शोषून घेते. परंतु, त्वचेचवर लालसरपणा आणि पुरळ उठू लागतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rubiks Cube: रूबिक्स क्यूब खेळण्याचे आश्चर्यकारण फायदे कोणते?

Broccoli for Weightloss: ब्रोकोलीमध्ये 'या' आरोग्यदायी गुणधर्मांचा खजिना

Gondia News : गोंदियाच्या मुख्य जलाशयात १९ टक्के जलसाठा; पाणी टंचाईचे संकट उभे

SRH vs GT: गुजरातच्या विजयासाठी RCB अन् CSK चे देव पाण्यात! कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Loksabha Election 2024: लोकसभेचे नादखुळा उमेदवार! चक्क तिरडीवर बसून अर्ज भरायला पोहोचले, स्मभानभुमीत 'प्रचार' कार्यालय थाटले

SCROLL FOR NEXT