उन्हाळा सुरु झाला असून आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या मौसमात आपल्या राहाणीमानात आणि आहारात फार बदल होतात.
हिवाळा संपताच आपण गरम कपडे आणि तेलकट पदार्थांना मागे टाकून सुती कपडे आणि हलका आहाराकडे (Food) विशेष लक्ष देतो. एप्रिल महिना सुरु होताच पहिल्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD)ने एप्रिल-जून या तिमाहीत उन्हाच्या अधिक झळा सोसाव्या लागणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढण्याचा धोका देखील सांगितला आहे. रखरखत्या उन्हापासून (Summer Season) वाचण्यासाठी या टीप्स (Tips) फॉलो करा
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी, ताज्या फळांचा रस आणि नारळ पाणी प्या.
आवश्यक असल्यास घराबाहेर पडा. घराबाहेर जाताना स्कार्फ, छत्री, टोपी आणि सनग्लासेसचा वापर करा.
शारीरिक हालचाली कमी करा. बाहेर जाताना स्कार्फने तोंड झाका.
उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. तसेच उन्हात घराबाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर करा.
उन्हाळ्यात रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. उन्हाळ्यात चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी आणि थकवा अधिक प्रमाणात जाणवतो. ही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सूर्याच्या अतिनिल किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी कमीतकमी एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन लावा, सनग्लासेस घाला.
आहारात कैरीचे पन्हं, ताक, लस्सी, दही, कच्चा कांदा, लिंबूपाणी यांचा समावेश करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.