Hair Growth Smoothie, Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Growth Smoothie : सततच्या केस गळतीमुळे वैतागले आहात? बायोटिन स्मूदी ठरेल फायदेशीर

Hair Care Tips : उन्हाळा सुरु झाला की, केसगळतीच्या अनेक समस्या वाढतात. सततच्या घामामुळे केस ओले होणे, केसात कोंडा होणे, केसांची वाढ खुटणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Hair Falls Problem :

उन्हाळा सुरु झाला की, केसगळतीच्या अनेक समस्या वाढतात. सततच्या घामामुळे केस ओले होणे, केसात कोंडा होणे, केसांची वाढ खुटणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होतात. परंतु, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती केसगळती आणि पांढऱ्या केसांच्या (Hair) समस्येमुळे त्रस्त आहेत. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केस खराब होतात.

बदलेली जीवनशैली (Lifestyle), चुकीचे खाणेपिणे अधिकचा तणाव यामुळे केसगळतीच्या अनेक समस्या समोरे आल्या आहे. शरीरातील जीवनसत्त्वे, प्रथिन्यांची कमतरता, औषधांचे अतिसेवन आणि थायरॉईड हे देखील कारण असू शकते. जर तुम्हालाही केस गळतीच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आहारात बायोटिन रिच स्मूदी ट्राय करु शकता. यामुळे केसगळती थांबेल तसेच केसांची वाढ होईल.

1. बायोटिन रिच स्मूदी रेसिपी

साहित्य

  • बदाम- ४ ते ५

  • अक्रोड- ४ ते ५

  • भोपळ्याच्या बिया- १ टेबलस्पून

  • मनुका- १ टेबलस्पून

  • खजूर- २ ते ४

  • अंजीर- २

  • चिया सिड्स- १ टेबलस्पून

  • फ्लेक्स बिया- १ टेबलस्पून

  • काजू- ७ ते८,

  • नारळाचे दूध- १०० मिली

2. कृती

  • स्मूदी बनवण्यापूर्वी काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे आणि अंजीर ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा.

  • भिजवलेले काजू, चिया सिड्स, भोपळा सिड्स, फ्लेक्स सिड्स आणि नारळाचे दूध मिक्सरमध्ये घेऊन वाटून घ्या.

  • स्मूदी घट्ट वाटत असेल तर पाणी (Water) घालून वाटू शकता. या स्मूदीमध्ये फॅटी अॅसिड, प्रथिने आणि पोषक घटक असतात. जे केसांच्या अनेक समस्यांवर फायदेशीर आहे.

3. हे लक्षात ठेवा

  • तसेच आहारात अंडी, चीज, स्प्राउट्स, डाळी, चिकन आणि फिश यांचा आहारात समावेश करा.

  • केसांना केमिकल फ्री शाम्पूचा वापर करा. तसेच केसांसाठी गरम पाण्याचा वापर टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT