Lips Care Tips, How to Lighten Dark Lips Saam Tv
लाईफस्टाईल

Lips Care Tips : उन्हामुळे ओठ काळवडंले? या टिप्स फॉलो करा, काळपटपणा होईल दूर!

How to Lighten Dark Lips: चेहऱ्याचे सौंदर्य हे आपल्या ओठांवर अवलंबून असते. मऊ, लाल, गुलाबी ओठ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. त्याचे काळे पडणे हे चेहऱ्याच्या सौंदर्यांवर डाग पडण्यासारखे आहे.

कोमल दामुद्रे

Black Lips Cure :

चेहऱ्याचे सौंदर्य हे आपल्या ओठांवर अवलंबून असते. मऊ, लाल, गुलाबी ओठ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. त्याचे काळे पडणे हे चेहऱ्याच्या सौंदर्यांवर डाग पडण्यासारखे आहे.

खराब जीवनशैली (Lifestyle), चुकीच्या वाईट सवयींमुळे आपले ओठ काळे पडतात. काहींना ओठांना लिपस्टिक लावणे आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. उन्हाळ्यात सहसा ओठ काळपटतात. ज्यामुळे ओठांचे सौंदर्य खराब होते. जर तुमचेही ओठ काळवडंले असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा

1. ओठ काळे का होतात?

1. मृत त्वचा काढून टाकणे

ओठांची मृत त्वचा (Skin) न काढल्याने ते काळे होऊ लागतात. ओठांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी साखर (Sugar), मध आणि मलाई चांगले मिसळा. ओठांना स्क्रब करा आणि मृत त्वचा काढून टाका. मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. यामुळे ओठांचा काळपटपणा निघून जाईल.

2. धुम्रपान

ओठ काळे होण्याचे आणखी एक कारण धुम्रपान. हल्ली अनेकांना धुम्रपान करण्याची सवय आहे. ओठांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी धुम्रपान करणे टाळा.

3. मॉइश्चरायझ

ओठांना व्यवस्थितरित्या मॉइश्चरायझ न केल्यामुळे ते काळपटतात. चेहऱ्याप्रमाणे ओठांना मॉइश्चरायझ करा. यामुळे ओठांना पुरेसा ओलावा मिळतो.

4. ओठांना चावणे

अनेकांना सवय असते की, ते सतत ओठांना कुरतडत असतात. तुम्हाला तुमच्या ओठांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवायचे असेल तर ही सवय लगेच बदला.

2. ओठ निरोगी ठेवण्याचे उपाय

  • भरपूर पाणी प्या आणि स्वत:ला नेहमी हायड्रेट ठेवा.

  • ओठ चघळणे किंवा सतत कुरतडण्याची सवय सोडा.

  • ओठांची मृत त्वचा स्क्रब करत रहा.

  • ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावत रहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT