Summer Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Tips: उन्हाळ्यात चक्कर येण्याची समस्या ठरतेय गंभीर, कशी घ्याल काळजी?

Dizziness In Summer: सध्या उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.उष्माघातामुळे चक्कर येण्याचे प्रमाण देखील वाढू लागले आहे.

Manasvi Choudhary

Dizziness In Summer: सध्या उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या (Health) समस्या उद्भवत आहेत.उष्माघातामुळे चक्कर आणि बेशुद्ध येण्याचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरील तापमानासह शरीरातील उष्णता वाढते यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

उन्हाळ्यामध्ये अनेकदा बाहेरून आल्यानंतर डोकं जड होतं आणि डोळ्यासमोर अंधार येतो यामुळे चक्कर आल्याचे जाणवते. तसेच वाढत्या उष्माघाताच्या समस्यामुळे चक्कर, मळमळ, छातीत दुखणे यासांरख्या समस्या होतात.

उन्हाळ्यात चक्कर का येते?

उन्हाळ्यात बाहेरील तापमानासह शरीरातील उष्णता देखील वाढते. शरीरातील उष्णता घामावाटे बाहेर पडते यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते यामुळे अनेकांना प्रवासादरम्यान चक्कर येते.

तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेमुळे शरीरातून घाम येतो. शरीरातील द्रवपदार्थ घामावाटे बाहेर पडल्याने शरीर डिहायड्रेट होते. यामुळे शरीराला पाण्याची कमतरता जाणवे तसेच मेंदूला रक्तप्रवाह होत नसल्याने चक्कर, मळमळ,बेशुद्ध पडणे यासांरख्या समस्या उद्भवतात.

चक्कर येण्याची लक्षणे दिसल्यास काय करावे

१) शरीर हायड्रेटेड ठेवा

जर तुम्हाला जास्त उष्णतेमुळे वारंवार चक्कर येत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका. नियमितपणे पाणी प्या.

२) लिंबाचे सरबत

रोज एका ग्लासमध्ये एक लिंबू पिळून त्याचे सेवन करा. लिंबू आपण कोशिंबीर किंवा इतर कोणत्याही गोष्टीत घालून देखील सेवन करू शकता.

३) आल्याचा चहा

उन्हाळ्याच्या दिवसात आल्याचा चहा प्या. यामुळे चक्कर येणे कमी होण्यास मदत होते.

४) हर्बल टी प्या

घराबाहेर पडताना चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी हर्बल चहाचे सेवन केल्याने चक्कर टाळता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 16 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर शेअर केली भावुक पोस्ट

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Ring Design : अंगठ्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स; हातात घालताच प्रत्येकजण विचारेल, "कुठून घेतली?"

ठाकरे बंधूंची युती कधी होणार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला|VIDEO

Bananas for diabetic patients: डायबेटिस पेशंटनं रोज केळी खावीत आणि किती खावीत? ब्लड शुगर वाढते? सगळ्या प्रश्नांचं १ उत्तर अन् दूर होतील सगळे गैरसमज

SCROLL FOR NEXT