Sugar Side Effects, Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Sugar Side Effects : साखर ठरू शकते तुमच्या आरोग्याला घातक, 'ही' लक्षणे जाणवली तर लगेच व्हा सावध!

चवीला गोड असणारी साखर आरोग्याला घातक कशी ठरेल हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Sugar Side Effects : साखर हा आपल्याला दैनंदिन जीवनातील एक असा पदार्थ आहे. ज्याच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. अनेक गोडाचे पदार्थ बनवताना साखरेशिवाय त्याची चव पूर्ण होत नाही.

सकाळच्या दिवसाची सुरुवात ते रात्री झोपेपर्यंत अशा अनेक गोष्टीत साखरेचा वापर आपण करत असतो. परंतु, साखरेचा आपल्या शरीरात अतिवापर झाल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आपल्या घरात पांढरी साखर साधरणत: चहा, कॉफी, सरबत व इतर गोडाच्या पदार्थांमध्ये वापरली जाते. परंतु आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या या पांढऱ्या पदार्थामुळे आरोग्याला हानी पोहोचते.

साखरेचे दिवसभरात किती प्रमाणात सेवन कराल ?

तज्ज्ञांच्या मते, आपण दैनंदिन जीवनात ६ चमच्या पेक्षा अधिक प्रमाणात त्याचे सेवन करु नये. परंतु, याचे दिवसभरात अधिक सेवन केल्यास शरीराला हानी पोहोचू शकते. हृदयाशी संबंधित आजार, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि अल्झायमरचा धोका यामुळे वाढू शकतो. तसेच हा धोका आपण वेळेत मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. अशी काही लक्षणे शरीरात दिसू लागतात ज्यावरून कळू शकते की आपण जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत आहात.

१. स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास -

आपली स्नायू आणि सांधे दुखत असतील तर याचे मुख्य कारण आपण अति प्रमाणात साखरेचे (Sugar) सेवन करत असू. आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे सांधेदुखी, मोतीबिंदू, हृदयविकार व स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. (Sugar Side Effects On Health)

२. ऊर्जा पातळी वाढणे किंवा कमी होणे -

सकाळी आपण चहा किंवा कॉफीचे सेवन करुन आपल्याला ऊर्जा मिळत असली तरी, ग्लुकोज आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करते. त्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवणे जास्त गरजेचे आहे. ज्यावेळी आपण गोड खातो तेव्हा स्वादुपिंड पेशींमध्ये ग्लुकोज आणण्यासाठी इन्सुलिन सोडते त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. शरीरात साखरेचे प्रमाण कमी झाल्यास आपल्याला लो फिल होते. त्यामुळे साखरेची मागणी अधिक होऊ लागते.

३. त्वचेच्या समस्या -

गोडाचे प्रमाण शरीरात जास्त झाल्याने इन्सुलिनची पातळी वाढते आणि ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू होते. जर ग्लुकोज आपल्या शरीरातील रक्तप्रवाहात शिरले तर आपल्याला जळजळ व त्वचेच्या (Skin) समस्या उद्भवू शकतात. (Sugar Side Effects On Skin)

४. वजन वाढण्याचे कारण -

तज्ज्ञांच्या मते, जास्त साखर खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते. चॉकलेट किंवा केकसारखे फास्ट फूड किंवा मिठाई सारख्या अनेक पदार्थातून आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे आपले वजन वाढू लागते.

५. दात किडणे -

लहान मुले सतत गोड पदार्थ खातात त्यात साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे आपल्याला दातांना त्याचा त्रास होऊ लागतो. खाल्ल्यानंतर आपल्या दातांवर साखरेचा थर तयार होतो. हे दातांच्या कठीण भागाला हानी पोहोचवते त्यामुळे दातात छिद्रे निर्माण होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT