Skin Care Tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Skin Care : मुरुमांपासून तुम्ही देखील त्रस्त आहात तर; हे उपाय करुन पहा.

मृत त्वचेच्या पेशी त्वचेची छिद्रे बंद करतात ज्यामुळे नवीन पेशींच्या वाढीस प्रतिबंध येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुरुमांचा तुम्हाला देखील कंटाळा आला आहे? पुरळ का होतात? यापासून तुम्ही देखील त्रस्त आहात तर, आज आम्ही तुम्हाला सांगतो. जेव्हा तुमच्या त्वचेचे छिद्र जास्त तेल आणि घाणीमुळे संकुचित होते तेव्हा मुरुमे येतात. मृत त्वचेच्या पेशी त्वचेची छिद्रे बंद करतात ज्यामुळे नवीन पेशींच्या वाढीस प्रतिबंध येतो. यामुळे व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्ससारखे ब्रेकआउट होतात ज्याचे रुपातंर पिंपल्समध्ये होते. हे सहसा त्वचेवर दिसणारे लाल ठिपके असतात आणि बरे होण्यास वेळ लागतो. हार्मोनल असंतुलन आणि अयोग्य स्वच्छता यामुळे देखील मुरुम होऊ शकतात. (Skin Care Tips in Marathi)

हे देखील पहा -

तुमच्या त्वचेवरील मुरुम टाळण्यासाठी व त्यापासून मुक्त होण्यासाठी काही सोपे उपाय:

१. व्यायाम -

दररोज व्यायाम करणे खरोखर महत्वाचे आहे. व्यायामामुळे शरीरातील कार्टिसोल आणि स्ट्रेस (stress) हार्मोन्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य (Health) आणि मूड सुधारण्यास देखील मदत करते. यामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि हार्मोन्स नियंत्रितणात राहते.

२. निरोगी आहार -

सकस आणि संतुलित आहार घेण्याची सवय लावा. मुरुमांचे मुख्य कारण आहे ब्रेड आणि चिप्स सारख्या कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन. तसेच मिठाईंसोबत चॉकलेट खाणेही टाळावे. त्याऐवजी तुम्ही भाज्या, फळे, ज्यूस, शेंगदाणे, शेंगा आदी पदार्थांचे (Food) सेवन करु शकता ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. मुरुम कमी करण्यासाठी वारंवार पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

३. स्वच्छता -

मुरुमांमागे घाण व धूळ हे प्रमुख कारण आहे. वेळेवर उपचार न केल्यास ते बॅक्टेरियामध्ये बदलते ज्यामुळे मुरुम होतात. केवळ स्वतःमध्येच नव्हे तर आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे देखील गरजेचे आहे.

४. सतत चेहरा धुणे -

मुरुमांच्या समस्येमधे आणखी एक महत्त्वाचे कारण आपण चेहरा वारंवार धुत नाही. चेहरा वारंवार धुतल्यामुळे त्वचेवर जमा झालेली धुळ व तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. तसेच मुरुमांची समस्यादेखील कमी होते.

हे उपाय नक्की करुन पहा आणि मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळवा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama: 'अशोक मा.मा.' मालिकेत वर्षा उसगांवकर यांची धमाकेदार एन्ट्री; रंगणार मंगळागौरीचा महाखेळ, पाहा VIDEO

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेची आत्महत्या नव्हे हत्याच, समितीचा धक्कादायक अहवाल समोर

Diva Station Platform : पाठलाग करत मागे आला, अन् अचानक महिलेला मालगाडीखाली ढकललं, पहाटे दिवा स्टेशनवर थरारक घटना

Ind vs Pak Match Cancel: भारत-पाकिस्तान सामना रद्द; आयोजकांकडून अधिकृत घोषणा, काय सांगितलं कारण?

Maharashtra Live News Update: भिमाशंकर अभारण्यातील पर्यटनस्थळांवर बंदी

SCROLL FOR NEXT