Right Way To Take Medicine 
लाईफस्टाईल

Health News: सावधान! चहा-कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका ही ५ औषधं; अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Right Way To Take Medicine: आपल्यापैकी बरेच जण चहा किंवा कॉफीसोबत औषध घेतात. मात्र असं करणं योग्य आहे का, जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसांची सुरुवात चहा कॉफीने होते. अनेक अभ्यास आणि संशोधनातून या गोष्टी समोर आल्यात आहेत की, सकाळच्या वेळी कॉफी ही आरोग्यासाठी उत्तम असते. काही जणांना चहा- कॉफीसोबत औषधं घेण्याचीही सवय असते. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर सावधान व्हा.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहा आणि कॉफीमध्ये सामान्यपणे कॅफेन, निकोटीन, थियोब्रोमाईन यांच्यासह पाच अल्कलॉईड असतात. यांचं औषधांसोबत रिएक्शन होऊन तुमच्या त्याचे परिणाम कमी करतं. अशी काही औषधं आहेत, जी तुम्ही चहा-कॉफीसोबत घेणं रूग्णांनी शक्यतो टाळावं.

एंटीबायोटीक्स

चहा आणि कॉफीमध्ये असलेले घटक एंटीबायोटीक्सच्या औषधांचे परिणाम कमी करते. त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढू शकते.

पेनकिलर

काही प्रकारचे पेनकिलर चहा आणि कॉफीसोबत घेण्यास टाळलं पाहिजे. इबुप्रोफेन आणि नेपरोक्सन या पेनकिलर चहा आणि कॉफीसोबत घेतल्याने पोटात जळजळ होण्याची शक्यता अधिक असते.

थायरॉईडची औषधं

हाइपोथायरायडिझ्मची औषधं रूग्णांनी कॉफीसोबत घेतली तर त्याचा परिणाम शरीरावर कमी होऊ शकतो.

दम्याची औषधं

अस्थमाची औषधं देखील चहा किंवा कॉफीसोबत घेऊ नये. कॅफेनमध्ये ब्रोन्कोडायलेटर असतं, ज्यामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. शिवाय यामुळे डोकेदुखी, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा या समस्या वाढण्याचा धोका असतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

Kelyacha Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा मऊसूद आणि चविष्ट केळ्याचा शिरा

Ranbir Kapoor -Ramayana : भारतीय चित्रपटाचा जगभरात बोलबाला, 'या' कारणांमुळे खास आहे रणबीर कपूरचा 'रामायण'

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Weight Loss Recipe : डाळ बनवताना 'हे' पदार्थ नक्की टाका, लठ्ठपणा झपाट्याने होईल कमी अन् दिसाल स्लिम-ट्रिम

SCROLL FOR NEXT