No Sugar Diet: १४ दिवस साखर खाल्ली नाही तर...; शरीरात जाणवू लागतील 'हे' बदल

No Sugar Diet plan day to day : साखर अधिक प्रमाणात खाणे आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळं आता नो शुगर डाएटचा पर्याय समोर आला आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय सकारात्मक परिणाम होतो, हे जाणून घेऊयात.
No Sugar diet | २ आठवडे साखर खाल्ली नाही तर शरीरावर काय होतील पॉझिटिव्ह परिणाम? वाचा
No Sugar diet | २ आठवडे साखर खाल्ली नाही तर शरीरावर काय होतील पॉझिटिव्ह परिणाम? वाचाyandex
Published On

सुरभि जगदीश, साम डिजिटल

आपल्या दररोजच्या आहारात साखरेचा (Sugar) समावेश हा हमखास असतोच. चहा, कॉफी, बिस्कीट, चॉकलेट या सर्व खाद्यपदार्थांमध्ये साखर असते. एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. मात्र आपल्या आरोग्यासाठी साखर ही हानिकारक असते. (Benefits Of Not Having Sugar)

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, अतिप्रमाणात साखरेचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अतिप्रमाणात साखरेच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयासंबंधीचे आजार वाढण्याची शक्यता असते. अशावेळी साखर कमी खाण्याचा किंवा न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशातच १४ दिवस साखरेचं सेवन सोडल्यानंतर शरीरात नेमके कोणते बदल दिसतात हे जाणून घेऊया.

Day 1-3: 'ही' लक्षणं दिसून येऊ शकतात

एखाद्या गोष्टीची सवय सोडणं काहीसं कठीण असतं. साखरेचं सेवन करणं ३ दिवस थांबवल्यानंतर डोकेदुखी, पोटदुखी आणि थकवा येण्याच्या समस्या दिसून येऊ शकतात.

Day 4-7: ऊर्जा

साखर सोडल्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला फ्रेश वाटू लागू शकतं. यामध्ये तुमच्या शरीरात एकदम ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटेल. तसंच तुमची शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहू शकते.

Day 8-10: पचनकार्य

साखरेचं सेवन सोडल्यानंतर तब्बल ८-१० दिवसांनंतर तुमच्या पचनकार्यात सुधार होऊ शकतो. अशावेळी बद्धकोष्ठता, ब्लोटींग आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

No Sugar diet | २ आठवडे साखर खाल्ली नाही तर शरीरावर काय होतील पॉझिटिव्ह परिणाम? वाचा
Health Tips : फक्त स्वाद नाही तर तब्येतीसाठी सुद्धा गुणकारी आहे जायफळ; वाचा फायदे

Day 11-14: भूक कमी लागणं

साखरेचं सेवन पूर्णपणे बंद केल्याच्या २ आठवड्यानंतर आपोआप तुमची गोड खाण्याची इच्छा कमी होऊ लागते. याशिवाय झोपेसंबंधी काही समस्या असतील तर त्या कमी होण्यासही मदत होऊ शकते.

साखर सोडल्यामुळे शरीराला कोणते फायदे होतात?

वजन कमी करण्यास मदत

साखर ही हाय कॅलरी फूड असून जास्त साखरेचं सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या बळावू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही साखरेचं सेवन बंद केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, त्यांनी साखरेचं सेवन बंद करणं फायदेशीर ठरू शकतं.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्राणात राहील

साखरेचं सेवन बंद केल्यानंतर ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत होईल. साखरेचा थेट संबंध लठ्ठपणा आणि मधुमेहाशी आहे. अशावेळी आहारात साखर बंद केल्यास टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. मात्र बंद केल्यानंतर पुन्हा साखरेचं सेवन केल्यास ब्लड शुगर लेवल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थकवा दूर होतो

साखरेच्या सेवनाने ब्लड शुगर लेवल वेगाने वाढते. अशावेळी तुम्हाला थकवा आणि सुस्ती येऊ शकते. मात्र जर तुम्ही साखरेचं सेवन बंद केलं तर रक्तातील साखर नियंत्रणात राहून तुम्हाला एनर्जेटीक आणि एक्टिव वाटू शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

No Sugar diet | २ आठवडे साखर खाल्ली नाही तर शरीरावर काय होतील पॉझिटिव्ह परिणाम? वाचा
Cholesterol Diet Tips : गव्हाच्या पिठात मिक्स करा 'ही' एक गोष्ट; कॉलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम कायमचा दूर होईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com