IIT Mumbai News जयश्री मोरे
लाईफस्टाईल

Mumbai Top Colleges: इथं शिक्षण घेणं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न, हे आहेत मुंबईतील टॉप 8 कॉलेज

Top 8 Colleges In Mumbai: आज आम्ही तुम्हाला मुंबईमधील काही अशा कॉलेजबद्दल माहिती सांगणार आहोत जिथं शिक्षण घेणं विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे.

Satish Kengar

Top 8 Colleges In Mumbai:

आज आम्ही तुम्हाला मुंबईमधील काही अशा कॉलेजबद्दल माहिती सांगणार आहोत जिथं शिक्षण घेणं विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला मुंबईच्या टॉप 8 कॉलेजेसची माहिती सांगणार आहोत, जी 2023 च्या रँकिंगवर आधारित आहे. चला पाहू संपूर्ण लिस्ट...

आयआयटी बॉम्बे

मुंबईच्या टॉप कॉलेजच्या यादीत पहिले नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेचे आहे. भारतातील टॉप 50 कॉलेजेसमध्ये हे कॉलेज दहाव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजमध्ये B.Tech, M.Tech, B.Sc, M.Sc असे 20 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

आयसीटी मुंबई

मुंबईच्या टॉप कॉलेजच्या यादीत दुसरे नाव इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (ICT Mumbai) आहे. हे कॉलेज केवळ मुंबईतीलच नाही तर भारतातील सर्वोच्च कॉलेजपैकी एक आहे. मुंबईतील अव्वल अभियांत्रिकी कॉलेजच्या यादीत हे कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरडी नॅशनल कॉलेज

या यादीत तिसरे नाव आरडी नॅशनल कॉलेजचे आहे. या कॉलेजमध्ये B.Com, BMS, B.Sc, BMM, BA, MA, M.Sc असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे कॉलेज मुंबईतील टॉप कॉलेजांपैकी एक आहे आणि कॉलेजची फीही जास्त नाही.  

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई

हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन या विषयात पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मुंबईतील सर्वोत्तम कॉलेज आहे. मुंबईतील टॉप 8 कॉलेजच्या यादीत हे कॉलेज चौथ्या क्रमांकावर आहे. (Latest Marathi News)

सेंट झेवियर्स कॉलेज

मुंबईच्या टॉप कॉलेजच्या यादीत पुढचं नाव सेंट झेवियर्स कॉलेजचं आहे. या कॉलेजमध्ये B.Sc, BMM, B.Com, BA, BMS, M.Sc, MA असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज

मुंबईतील टॉप टेन कॉलेजच्या यादीत नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज सहाव्या क्रमांकावर आहे. सार्वजनिक समीक्षणात या कॉलेजला 10 पैकी 7.6 गुण मिळाले आहेत. या कॉलेजमध्ये बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, बीडीएस), एमडीएस (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी, एमडीएस) सारखे दंतविषयक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन

मुंबईचे हे अव्वल महाविद्यालय सेंट झेवियर्स महाविद्यालयाची स्वायत्त संस्था आहे. या कॉलेजमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, जनरलिझम जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, फिल्म टेलिव्हिजन आणि डिजिटल व्हिडिओ प्रॉडक्शन, अॅडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग कम्युनिकेशनचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

हे कॉलेजही मुंबईतील पहिल्या आठ कॉलेजांपैकी एक आहे. या कॉलेजमध्ये दंत संबंधित बॅचलर (बीडीएस), मास्टर्स (एमडीएस) आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माढामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT