Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : अभ्यास करुनही तुमचे मुल 'ढ' का आहे ? तज्ज्ञांनी सांगितले कारण

बाळाला जरावेळ देखील स्क्रीन पाहाता नाही आली की, ते खाण्यापिण्यास असंख्य प्रमाणात नाटकी करु लागतात.

कोमल दामुद्रे

Parenting Tips : हल्लीची मुलं जन्मजात येताच फोन व टीव्ही पाहण्याचे वेड सोबत घेऊन येतात असं म्हटलं तरं वावगं ठरणारं नाही.

बाळाच्या जन्मानंतर त्याला खाऊ घालताना हल्लीची पिढी त्याला सरार्स फोन देते. आईपेक्षा बाळाला मग त्या फोनचा लळा जास्त प्रमाणात लागतो. मग बाळाला जरावेळ देखील स्क्रीन पाहाता नाही आली की, ते खाण्यापिण्यास असंख्य प्रमाणात नाटकी करु लागतात.

जसं जसं वय वाढतं जाते तसं तसं हा स्क्रीन टाइमही वाढतो. कोरोना काळानंतर हल्ली प्रत्येक लहान मुलांना जास्त टीव्ही पाहण्याची किंवा फोन किंवा टॅबलेट वापरण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या शैक्षणिक (Education) कामगिरीवर दीर्घकाळ परिणाम झाला आहे. असे एका नव्या अभ्यासात म्हटले आहे.

JAMA Pediatrics जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, लहान वयात जास्त स्क्रीन पाहिल्याने बालक (Child) 9 वर्षांचे होईपर्यंत त्याची स्मरणशक्ती कमकूवत होते.

1. एग्‍जीक्‍यूटिव फंक्‍शनिंग काय आहे ?

हार्वर्ड युनिव्हर्सिटी सेंटरच्या मते, कार्यकारी कार्य कौशल्ये ही मानसिक प्रक्रियांशी संबंधित असतात. हे योजना करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास, सूचना लक्षात ठेवण्यास आणि मल्टीटास्क करण्यास सक्षम करते. याचा परिणाम मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक यशावर होतो असे डॉ. एरिका चीप्पिनी, बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील मानसोपचार आणि वर्तणूक विज्ञानाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणतात.

Child study

2. तज्ज्ञ काय म्हणतात

या अभ्यासात, 437 मुले घेण्यात आली ज्यांचे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी स्कॅन होते. यामध्ये 1, 18 महिने आणि 9 वर्षांच्या वयात मेंदूच्या संज्ञानात्मक कार्यांचे तंत्रिका मार्ग पाहिले गेले. पालकांनीही प्रत्येक मुलाच्या स्क्रीन टाइमची माहिती दिली. संशोधकांना लहान वयात स्क्रीन वेळ आणि वयाच्या 9 व्या वर्षी लक्ष आणि कार्यकारी कार्य यांच्यातील संबंध आढळले.

3. स्क्रीनची अभ्यासात कोणतीही मदत नाही

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, लहान मुले स्क्रीनवरून फारसे शिकत नाहीत. मुलांना स्क्रीनवरील माहिती समजण्यात अडचण येते आणि ते वास्तविक जगापासून (World) कल्पनारम्य वेगळे करू शकत नाहीत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुलांसाठी शिकण्याचा आणि विकसित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रौढांशी संवाद आणि शिकवणे. डॉ. चिप्पिनी म्हणतात की पडद्यांसह ते साध्य करणे कठीण आहे.

4. स्क्रीनपासून मुलांना लांब कसे ठेवाल ?

कधी-कधी तुम्ही घरच्या (Home) कामात खूप व्यस्त असता आणि मुलाला पडद्यावर व्यस्त ठेवण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तसेच, लहान मुलांनी पडद्यापासून दूर राहणे चांगले . मुलाला त्याचे काम पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी आपण त्याला खेळणी किंवा रंगीत पुस्तके देऊ शकता. तुमच्या मुलाच्या स्क्रीन टाइमची काळजी घ्या आणि त्याला त्याच्या मर्यादेबाहेर जाऊ देऊ नका.

Child care

5. नुकसान

medlineplus.gov नुसार , स्क्रीनवर जास्त वेळ घालवण्यामुळे मुलाला रात्री झोप न लागणे, स्कमरणशक्ती कमकुवत, अभ्यास करुनही लक्षात न राहाणे, लक्ष देण्याच्या समस्या, चिंता आणि नैराश्य आणि वजन वाढू शकते. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी, तुमच्या मुलाच्या बेडरूममधून टीव्ही किंवा कॉम्प्युटर काढून टाका, जेवण किंवा गृहपाठ करताना टीव्ही पाहू देऊ नका, टीव्ही पाहताना किंवा कॉम्प्युटर वापरताना तुमच्या मुलाला जेवायला देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT