Toilet Scrolling side effect  Saam tv
लाईफस्टाईल

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Toilet Scrolling side effect : टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणाऱ्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, असा खुलासा एका अभ्यासातून समोर आला आहे.

Vishal Gangurde

टॉयलेटमध्ये फोन वापरणाऱ्यांमध्ये मूळव्याधचा ४६% अधिक धोका

कमोडवर जास्त वेळ बसल्याने गुदद्वारावर दबाव निर्माण होत असल्याचे अभ्यासातून माहिती समोर

टॉयलेटमध्ये ६६% लोक फोन वापरतात

'प्लॉस वन' मासिकातून अभ्यासात खुलासा

मोबाईल फोन अनेकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे. मात्र, हाच मोबाईल अधिक वेळ वापरणे धोकादायक ठरू लागलंय. अनेक लोक टॉयलेटमध्येही फोन वापरतात. काही जण टॉयलेटमधील कमोडवर सोशल मीडियावरील रील्स पाहण्यात तासंतास घालवतात. कमोडवर जास्त वेळ बसल्याने मूळव्याधसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत एका अभ्यासात मोठा खुलासा झाला आहे. टॉयलेटमधील कमोडवर बसून फोन वापरणाऱ्यांना मूळव्याधसारख्या आजाराचा धोका ४६ टक्के असतो, असा खुलासा अभ्यासातून करण्यात आला आहे.

'प्लॉस वन' नावाच्या मासिकात याबाबत रिपोर्ट जाहीर करण्यात आला. हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अनेक पुरुष आणि महिलांना टॉयलेटमध्ये स्मार्टफोनच्या वापरावरून प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ६६ टक्के लोकांनी टॉयलेटमध्ये फोन वापरत असल्याचे कबुल केले.

कोलोनोस्कोपीच्या आधारे ज्या लोकांनी टॉयलेटमध्ये फोन वापरला नाही. त्यातील ३८ टक्के लोकांना मूळव्याधसारखे आजार झाले. तर टॉयलेटमध्ये फोन वापरणाऱ्या ५१ टक्के लोकांना मूळव्याधचा आजार झाल्याचे आकडेवारीतून समोर आलं. संशोधनानुसार, टॉयलेटमध्ये स्मार्टफोनमध्ये वापरणाऱ्यांवर ४६ टक्के लोकांमध्ये मूळव्याधचा धोका बळावल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने मूळव्याध आजार कसा होतो?

टॉयलेटमध्ये कमोडवर अधिक वेळ बसल्याने मूळव्याधाचा आजार बळावण्याची शक्यता अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. कमोडवर अधिक वेळ असलेल्या गुदद्वारावर दबाव निर्माण झाल्याने सूज निर्माण होते. त्यामुळे पुढे मूळव्याधाचे आजार होतात.

रिपोर्टनुसार, काही लोक फोन घेऊन न जाताही अधिक वेळ टॉयलेटमध्ये बसतात. मात्र, काही जण रिल्स पाहण्यासाठी टॉयलेटमध्ये अधिक वेळ घालवत असल्याचे समोर आलंय. तर टॉयलेटमध्ये ५४ टक्के लोक वृत्तपत्र वाचतात. तर ४४ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

5 Uses of Used Tea Powder: चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर फेकून देताय? जाणून घ्या तिचे हे 5 जबरदस्त फायदे, घर होईल चकाचक!

SCROLL FOR NEXT