Teeth Whitening Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Yellow Teeth: दातांवरील हट्टी प्लॅक काही केल्या निघत नाहीये? हळदीत मिसळा 'ही' गोष्ट, दात मोत्यासारखे चमकतील

Yellow Teeth Remedies: दातांच्या पृष्ठभागावर प्लॅक इतका जमा होतो की तो सहज साफ करता येत नाही. यामुळे दातांवर पिवळेपणा तर येतोच, शिवाय दात किडणं, श्वासांना दुर्गंधी आणि हिरड्यांचा त्रास यासारख्या समस्याही उद्भवतात.

Surabhi Jayashree Jagdish

दातांची निगा राखणं फार गरजेचं असतं. दात स्वच्छ न केल्यास ते पिवळे पडू लागतात. दातांची योग्य प्रमाणात निगा राखली नाही की त्यांच्यावर प्लॅक जमा होऊ लागतो. दातांच्या पृष्ठभागावर प्लॅक इतका जमा होतो की तो सहज साफ करता येत नाही. यामुळे दातांवर पिवळेपणा तर येतोच, शिवाय दात किडणं, श्वासांना दुर्गंधी आणि हिरड्यांचा त्रास यासारख्या समस्याही उद्भवतात.

जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर हळदीचा वापर करून प्लॅक काढून टाकता येऊ शकतो. हळदीचा वापर केल्याने प्लॅक दूर होण्यास मदत होते. दातांवर जमा झालेला प्लॅक तुम्ही कसा काढू शकता हे जाणून घेऊया. यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा वापर करू शकता याची माहिती घेऊया.

दातांवरील प्लॅक हटवण्याचे घरगुती उपाय

हळद आणि नारळाचं तेळ

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी किंवा दातांवरील प्लॅक हटवण्यासाठी हळद आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून दात स्वच्छ करू शकतात. हे मिश्रण ब्रशवर लावा आणि त्यानंतर दात स्वच्छ करा. यामुळे दात पांढरे देखील होऊ शकतात.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा ब्रशवर लावून दात घासणं हा देखील एक उत्तम पर्याय मानला जातो. बेकिंग सोड्याने दात घासल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. बेकिंग सोडाच्या गुणधर्मामुळे तोंडात साचलेले बॅक्टेरियाही दूर होतात. यावेळी बेकिंग सोड्यामध्ये पाणी टाकूनही पेस्ट तयार करा.याशिवाय बेकिंग सोडामध्ये मीठ मिसळून दात स्वच्छ करता येतात.

संत्र्याची साल

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी संत्र्‍याच्या सालीचाही तुम्ही वापर करू शकता. संत्र्याची साल वाळवून बारीक करून घ्या. या पावडरमध्ये पाणी घालून दातांवर चोळा. यामुळे दातांचा पिवळसरपणा दूर होतो. याशिवाय दातांवरील हट्टी प्लॅक देखील निघून जातो.

या टीप्सचाही करा वापर

  • तुमच्या दातांवर प्लॅक तयार होण्यापासून रोखण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासणं गरजेचं आहे.

  • दातांवरील प्लेक काढून टाकण्यासाठी फ्लॉस प्रभावी ठरतं.

  • तुम्ही माऊथवॉशचा देखील वापर करू शकता. यामुळे दातांमध्ये साचलेली घाण निघू लागते.

  • रात्री अन्न जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी तोंड पूर्णपणं स्वच्छ करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT