Stubborn Child canva
लाईफस्टाईल

Stubborn Child Behavior: तुमची मूलं खूप हट्टी आहेत का? असा दूर करा हट्टीपणा

How To Deal With Stubborn Child: लहान मुलं हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांना योग्य वळण आणि उत्तम संस्कार द्यायचे असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खरं तर मुल गर्भाशयात असल्यापासून आई त्याच्यावर संस्कार करायला सुरूवात करते. पण जेव्हा मुलांना आपण बाहेरचं जग दाखवतो तेव्हा त्यांना सगळ्याच गोष्टी आवडतात. ते त्या गोष्टींचा हट्ट करायला लागतात. बऱ्याच वेळेस मुलं आपल्या आईकडेच हट्ट करतात. याचं कारण म्हणजे बऱ्याच घरांमध्ये बाबा कामाला जातात. त्यामुळे आई जवळ मुलं जास्त वेळ असतात. या हट्टावर काय उत्तर द्यायचे हे शिकणे महत्वाचे आहे.

तुमची मुलं जेव्हा शाळेत जाण्याच्या वयाची होतात तेव्हा ते रोज नविन मुलांना भेटतात. अश्या वेळेस ' आई मला ही वस्तू हवी ' अश्या विनवण्या मुलं करतात. तेव्हा इतर मुलांकडे ज्या वस्तू बघतात त्या गोष्टींचा हट्ट करायला सुरुवात करतात. अश्या वेळेस पालकांनी स्मार्ट असणं गरजेचे आहे. मुलं जे मागतात ते त्याच वेळी त्यांना न देता त्यावर पालकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांची मागणी खरचं इतकी महत्वाची वस्तू आहे का? हे त्यांना पटवून दिले पाहिजे. हे करत असताना त्यांना आपण कमी दर्जा देतोय असे वाटता कामा नये.

सर्वप्रथम मुलांना पटकन नकार देणं टाळलं पाहिजे. त्यांना काय हवं? हे कळल्यावर त्यांनी ते कुठे पाहिलयं? हे विचारा. त्यांच्या मित्र परिवाराकडे ती वस्तू आहे का? याची शहानिशा करा. तसेच त्या वस्तूंची सध्या गरज नाही हे त्यांना पटवून द्या. मुलांना लहान वयातच पॉकेट मनी द्यायला सुरूवात करा. त्याचा योग्य वेळी वापर, पैश्यांची बचत या गोष्टी योग्य वयात शिकवायला सुरूवात करा. त्याने मुलांचे हट्ट कमी होण्यासाठी मदत होईल.

लहान मुलं एकाच ठिकाणी थांबून वैतागतात. त्यामुळे त्यांना सहलीला घेवून जायचा प्लॅन करा. जास्त स्क्रिन पाहण्याची सवय लावू नका. त्यात खूप गोष्टी त्यांना दिसतील आणि पुन्हा ते हट्ट करायला सुरूवात करतील. त्यांना स्क्रिनवर नविन गोष्टी दाखवण्यापेक्षा जमल्यास प्रत्यक्षच दाखवा. ही आश्वासनं सुद्धा लहान मुलांच्या मनावर चांगला परिणाम करतात. त्याच सोबत त्यांच्याकडे असलेल्या वस्तुंचा वापर करायला लावा. त्यांनी नविन गोष्टी मागितल्यास जुन्या आणि आवडत्या वस्तुंच काय? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा करा. अशा पद्धतीचा वापर करुन तुम्ही मुलांना हट्ट करण्यापासून लांब करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT