Manasvi Choudhary
अभिनेत्री दीपिका पादुकोण आई झाली आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीपिका आणि रणवीरला मुलगी झाली.
दीपिका आणि रणवीर आई- वडील झाल्याने खूप आनंदी आहे.
सेलिब्रिटीसह चाहत्यांनीही या कपलवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
दीपिकाने बाळ जन्मल्यानंतर ती कामातून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले होते.
दीपिका बाळाला सांभाळण्यासाठी नॅनी ठेवणार नसल्याचं सांगितलय.
बाळाची संपूर्ण काळजी ती स्वत: करणार असल्याचं तिने सांगितलं आहे.