Manage Stress at Office Saam TV
लाईफस्टाईल

Manage Stress at Office : ऑफिसमधील कामामुळे स्ट्रेस वाढत आहे? 'या' टिप्स फॉलो करा आणि रिलॅक्स व्हा

Stress Managment : सध्याच्या स्पर्धेच्या जगात अनेक व्यक्तींना ऑफिसमधील कामामुळे ताण येतो. डोक्यावरचा आणि मनावरचा तणाव वाढत जातो.

Ruchika Jadhav

जीवन जगण्यासाठी पैशांची गरज प्रत्येकाला असते. जास्तीत जास्त पैसे मिळावेत यासाठी प्रत्येक व्यक्ती ऑफिसच्या कामात स्वत:ला झोकून देण्याचा प्रयत्न करतो. सध्याच्या स्पर्धेच्या जगात अनेक व्यक्तींना ऑफिसमधील कामामुळे ताण येतो. डोक्यावरचा आणि मनावरचा तणाव वाढत जातो. हा ताण आणखी जास्त वाढल्याने डिप्रेशन आणि मानसीक आजारांचा सामना करावा लागतो.

कामाचा ताण वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कमी पगाराची नोकरी, पैसे कमी आणि काम जास्त, चांगल्या कामाचे कौतुक न करणे, बॉसकडून कामाचा प्रेशर वाढणे, सहकाऱ्यांसोबत वाद, ऑफिसमध्ये योग्य सोयी सुविधा नसणे अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.

ब्रेक घ्या

कामातील वाद किंवा कामाचा ताण प्रमाणापेक्षा जास्त वाढला असेल तर स्वत:ला थोडा वेळ द्या. त्यासाठी कामातून स्वत:साठी ३ किंवा ४ दिवसांची सुट्टी घ्या. सुट्टी घेऊन आपल्या जवळच्या मित्रांसोबत बाहेर फिरण्यासाठी जा. फिरताना नेहमी शांत आणि निसर्गाच्या विळख्यात असलेल्या ठिकाणीच भेट द्या. त्यामुळे तुमचं डोकं आणि मन शांत होईल आणि टेन्शनपासून तुमची सुटका होईल.

मेडिटेशन करा

कामाचा ताण वाढतो तेव्हा प्रत्येकाला मेडिटेशनची गरज असते. अनेकदा ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छा असूनही काही कारणांमुळे डिप्रेशन येतं. अशावेळी एखाद्या मंदिरात किंवा कोणत्याही एका शांत ठिकाणी जा आणि डोळे बंद करून मेडिटेशन करा. त्याने तुमच्या डोक्यावर आलेला ताण कमी होईल.

कामाची वेळ निश्चित करा

ऑफिसमध्ये काम करताना आपण अनेकदा विविध जबाबदाऱ्या आपल्यावर घेतो. त्यामुळे आपल्याला मानसीक थकवा आल्याचं जाणवतं. काहीवेळा आपण घेतलेल्या मेहनतीचे ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक केले जात नाही, त्यामुळे कामाचा उत्साह आणखी कमी होतो. असे तुमच्यासोबत सुद्धा घडत असेल तर आधी कामाची वेळ निश्चित करा. काम संपवून स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ द्या. त्यामुळे सुद्धा तुम्हाला बरं वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT