hand dryer health risk google
लाईफस्टाईल

Public Toilet Risk: शौचालयातील हँड ड्रायरमुळे आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Hand Dryer Risk : सार्वजनिक शौचालयातील हँड ड्रायर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार ड्रायरमुळे जंतू पुन्हा हातांवर येतात. त्यामुळे टिश्यू किंवा पेपर टॉवेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

Sakshi Sunil Jadhav

  • हँड ड्रायरमुळे हातांवर जंतू पुन्हा येतात.

  • जेट एअर ड्रायर विशेषतः धोकादायक आहेत.

  • मुलं, वयोवृद्ध व कमजोर इम्युनिटी असलेल्यांसाठी हा धोका जास्त आहे.

  • पेपर टॉवेल किंवा टिश्यू वापरणे सुरक्षित पर्याय आहे.

बऱ्याच जणांना कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागते. तसेच कामातही आपण ८ ते ९ तास असतोच. अशावेळेस तुम्हाला सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत असेल. तिथे असणारे हॅंड ड्रायर हे तुमच्या शरीसाठी धोक्याचे असू शकते. याबद्दल तज्ज्ञांनी काही महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालय वापरताना पुढे सांगितल्या प्रमाणे काळजी घ्या आणि कारणे नक्की वाचा.

सार्वजनिक ठिकाणी हात धुणे ही स्वच्छतेची पहिली पायरी मानली जाते. मात्र खरी समस्या हात धुतल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने वाळवायचे यामध्ये सुरू होते. पूर्वी लोक पेपर टॉवेल, रुमाल किंवा टिश्यूचा वापर करायचे. मात्र आता बहुतेक सार्वजनिक बाथरूममध्ये हँड ड्रायरचा वापर केला जातो. हे आधुनिक आणि पर्यावरणपूरक वाटत असले तरी वैद्यकीय संशोधनानुसार हे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक शौचालये आधीच जंतूंनी आणि विषाणूंनी भरलेली असतात. अशावेळी हँड ड्रायर चालू केल्यावर टॉयलेटमधून बाहेर पडणारे सूक्ष्म एरोसोल्स ड्रायरमध्ये खेचले जातात आणि पुन्हा आपल्या स्वच्छ हातांवर येतात. त्यामुळे हात धुतल्याचा काहीच फायदा होत नाही.

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, जेव्हा बाथरूममध्ये ड्रायर सुरू केला गेला आणि त्याजवळ पेट्री डिश ठेवण्यात आली, तेव्हा त्यात तब्बल २५४ बॅक्टेरियाच्या कॉलनी वाढल्या. मात्र ड्रायर बंद असताना असे काही झाले नाही. त्यामध्ये जेट एअर ड्रायर जास्त धोकादायक ठरतात. कारण त्यातून बाहेर पडणारी हवा दूषित कणांना हातांवर, कपड्यांवर आणि आसपासच्या वस्तूंवर पसरवते.

२०१८ मध्ये ‘अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजी’ने केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले की गरम हवेचे ड्रायर स्वच्छ हवा देत नाहीत. तर त्यातून जंतू बाहेर फेकले जातात. अगदी HEPA फिल्टर असले तरीही ते पूर्णपणे सुरक्षित ठरत नाहीत. डॉक्टरांच्या मते, मुलं, वयोवृद्ध तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना याचा धोका जास्त असतो. याशिवाय रुग्णालयात, क्लिनिकमध्ये किंवा खाद्यपदार्थांच्या उद्योगात काम करणारे लोकही यामुळे लवकर संसर्गाला बळी पडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

Mumbai Tourism: विकेंड ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट, दूर होईल कामाचा ताण

पैठण हादरलं! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या धमकीने शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं|VIDEO

Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT