Sakshi Sunil Jadhav
बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर होत असतो.
महिला आपल्या स्कीनची जितकी काळजी घेतात, तितकी केसांची घेत नाहीत. त्यामुळे महिलांना केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
महिलांचे सध्याच्या वातावरणात कोरडे होताना दिसत आहेत. त्यामुळे केसांची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? हे महिलांना कळत नाहीये. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेऊ.
अळशीच्या बिया केसांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्याने केसांचे सौंदर्य टिकते, केस मऊ आणि मजबूत होतात.
अळशीचे मास्क बनवण्यासाठी २ चमचे अळशी आणि अॅलोवेरा जेल हे सामान लागेल.
सुरुवातीला एक भांड्यात पाणी उकळवा. मग त्यामध्ये अळशीच्या बिया घालून मिक्स करा.
पाणी घट्टसर झाल्यावर की गॅस बंद करा. ते पाणी गाळून त्यामध्ये अॅसोवेरा जेल मिक्स करा. हे मिश्रण मिक्स करुन केसांना लावा.
३० मिनिटे मास्क तसेच ठेवल्यावर तुमचे केस सौम्य शॅम्पूने धुवून घ्या. याने तुमचे केस कोरडे होणार नाहीत.