stomach pain after eating google
लाईफस्टाईल

Stomach Pain Causes: जेवल्यानंतर पोटात दुखतं? रोजचं दुखणं अजिबात करु नका दुर्लक्षित, 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Stomach Pain After Eating: जेवल्यानंतर पोटात होणारी रोजची वेदना केवळ अॅसिडिटी नसून GERD, पेप्टिक अल्सर किंवा IBS सारख्या गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. वेळेवर उपचार आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याची लाइफस्टाइल पुर्वी पेक्षा वेगळी आणि कमी मेहनीची झाली आहे. आता लोक कामात अनेक डिजीटल उपकरणांचा वापर करतात. त्यामुळे शारीरिक श्रम कमी झाले आहेत. त्यातच अनेकांना कामानिमित्त बराचवेळ घराबाहेर राहावं लागतं. मग लोक बाहेरचे अरबट चरबट पदार्थ खातात. त्याने त्यांच्या पोटाच्या दुखण्यांमध्ये वाढ होते. पण घरचं खाल्यानेही काहींना पोट दुखीच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

बऱ्याचदा जेवल्यानंतर काहींच्या पोटात दुखतं. मग लोक अॅसिडीटी समजून त्यावर सोडा, ओवा खाऊन घरगुती उपचार करतात. पण हे दुखणं रोजचं असेल अजिबात त्याकडे दुर्लक्षित करु नका. ही गंभीर समस्या सुद्धा असू शकते.

तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर पोट दुखत असेल तर हे पचनाशी संबंधित समस्या असू शकते. अपचनामुळे किंवा जड जेवणामुळे पोटात दुखायला लागू शकतं. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD)मुळे पोटातले आम्ल हे वरच्या दिशेने वाढतं. त्याच कारणामुळे जळजळ आणि पोटात वेदना होतात. नाभीच्यावर या वेदना होतात.

Peptic ulcer मुळे पोटाच्या किंवा आतड्यांच्या आतील थरावर जखमा तयार होतात आणि जेवल्यानंतर वेदना वाढू शकतात. तसेच Irritable bowel syndrome (IBS) मुळे पोटदुखीसोबत गॅस, अतिसार किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार दिसून येते.

पोटदुखीसोबत जडपणा, पोटफुगी, छातीत जळजळ, ढेकर, मळमळ किंवा उलट्यांची भावना जाणवू शकते. काहींना भूक न लागणे आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणे सतत दिसत असतील तर ती शरीराचा इशारा असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर आणि हळूहळू जेवणे, मसालेदार व तळलेले पदार्थ टाळणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, ताण कमी ठेवणे आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT