PCOS Saam Tv
लाईफस्टाईल

PCOS : तज्ज्ञांच्या मते, पीसीओएस असल्यासही तुम्ही राहू शकता गर्भवती; फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा !

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा धोकादायक आजार नाही. हा फक्त आपल्या मासिक पाळी संबंधित असणारा विकार आहे, ज्यावर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींनी आपल्याला मात करता येऊ शकते.

कोमल दामुद्रे

PCOS : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा धोकादायक आजार नाही. हा फक्त आपल्या मासिक पाळी (Mensturation) संबंधित असणारा विकार आहे, ज्यावर जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींनी आपल्याला मात करता येऊ शकते.

आजकाल अनेक महिलांना पीसीओएसमुळे प्रजनन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पीसीओएस असलेल्या महिला वंध्यत्वाच्या बळी ठरतात ही भावना त्यांच्यामध्ये पसरू लागली आहे. परंतु हे केवळ अंशतः सत्य आहे. कारण पीसीओएस असला तरी तंत्रज्ञान व योग्य आहार घेतल्यास काही अंशी प्रमाणात आपली यातून सुटका होऊ शकते व गर्भवती होऊ शकतो.

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे काय ?

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएस हा हार्मोनल, चयापचय आणि पुनरुत्पादक विकार आहे. याचा प्रजननक्षम वयात येणाऱ्या महिलांवर त्याचा परिणाम होतो. यामध्ये अंडाशयाच्या आजूबाजूला सिस्ट वाढतात, ज्यामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो.

यामुळे मासिक पाळीत अनियमितता सुरु होते, त्याचा प्रवाह कमी किंवा वाढू शकतो. हे महिलांमध्ये वंध्यत्वाचेही एक प्रमुख कारण आहे. लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयविकाराचाही धोका असू शकतो.

जर तुम्हाला पीसीओएस असेल आणि तुम्ही बाळाची योजना करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

डॉ. शिखा द्विवेदी, इन-हाउस न्यूट्रिशनिस्ट आणि ओझिवा येथील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स म्हणतात, पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये वजन वाढणे आणि पुरळ येणे सामान्य आहे. काही प्रकरणांमध्ये त्यांना वंध्यत्वालाही सामोरे जावे लागते.

पीसीओएसवर कोणताही इलाज नाही हे डॉक्टर मान्य करतात. पण त्याची लक्षणे जीवनशैलीतील बदल, व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहाराने नियंत्रित करता येतात. जर तुम्हाला वंध्यत्वाची समस्या असेल तर तुम्ही प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काही उपाय करून पाहू शकता.

१. कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनचे प्रमाण संतुलित करा

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. नेहमी संतुलित आहार घ्या. इन्सुलिनच्या प्रभावीतेतील चढउतार दूर करणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी प्रथिनांचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्याला प्राधान्य द्यावे. प्रथिनांसह कर्बोदकांचे प्रमाण संतुलित करणे महत्वाचे आहे. सतत उपाशी राहू नका. जेवण वेळेवर करा. तुम्ही जे अन्न घेत आहात ते योग्य आहे की, नाही याची खात्री करा.

२. वनस्पती आधारित औषधे

डॉ. शिखा म्हणतात, 'तुमच्या आहारात वनस्पती-आधारित पूरक पदार्थांचा समावेश करा. तुम्हाला तुमच्या आहारातून सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नसतील. तर inositol किंवा myoinositol चे वनस्पती आधारित औषधे घ्या. हे डिम्बग्रंथि कार्य सुधारण्यास मदत करते आणि मासिक पाळी सामान्य करते.

३. अल्पकालीन उपचार

पीसीओएस आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्याचे पालन करा. शिखा सुचवते, 'तुम्ही N-acetylcysteine ​​सह अल्पकालीन उपचार देखील घेऊ शकता. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, जे प्रजनन क्षमता सुधारते आणि इन्सुलिन प्रतिरोध कमी करते. काही वनस्पती-आधारित घटक जसे की शतावरी हे प्रजननक्षम औषधी वनस्पती मानले जाते. तर, बन्स ओव्हुलेशन उत्तेजित करतात.

४. व्यायाम करा

पीसीओएस असूनही नियमित व्यायामाने प्रजननक्षमता वाढू शकते. परंतु फिजिओथेरपिस्ट किंवा योगा इन्स्ट्रक्टरकडून, तुम्हाला कोणते व्यायाम प्रजनन क्षमता वाढवू शकतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान ५ दिवस तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाणे बंद केले आणि जास्त व्यायाम करण्यास सुरुवात केली तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. यामुळे तुम्हाला तुमची मासिक पाळी वेळेवर मिळू शकणार नाही. त्यामुळे आहार आणि व्यायाम या दोन्हींचा समतोल राखला पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

SCROLL FOR NEXT