Food Items Act As Slow Poison : आपण घरामध्ये जेवण बनवतो ते आपल्याला हेल्दी वाटते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? की तुमच्या घरात बनवलेले जेवण सुद्धा अनहेल्दी असू शकते. हो तुम्ही बरोबर वाचलत.
घरामधले जेवण सुद्धा बाहेरच्या जेवणासारखं अनहेल्दी असू शकत. तुमच्या किचनमध्ये काही अशा पाच गोष्टी आहेत. ज्यामुळे तुमचं शरीर आजारी पडू शकते. चला तर मग जाणून घेऊ ते पाच गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.
1. मैदा :
स्ट्रीट फूड हे मैद्याशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक पदार्थांमध्ये मैद्याचा वापर केला जातो. छोले भटूरे पासून ते केक बनवण्यापर्यंत या सगळ्या पदार्थांमध्ये (Food) मैद्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. किचनमध्ये भेटणारा मैदा हे एक अशी सामग्री आहे ज्याचा उपयोग जास्त करून पार्टी मेन्यूसाठी वापरला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का की मैदा तुमच्या शरीराला आजारी पाडू शकतो. मैद्याचे सेवन केल्याने तुम्हाला कफ, अपचन, सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त मैदा खाल्ला की अशा अनेक आजारांना (Disease) सामोरे जावे लागते हे लक्षात ठेवा.
2. तेल (Oil) :
तेल आपल्या घरामधील अशी सामग्री आहे ज्याच्यापासून कुठलाही पदार्थ बनवणे अशक्य आहे. परंतु गरजेपेक्षा जास्त तेलाचा वापर केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर तुम्हाला हृदयविकार, स्ट्रोक, छातीचे आजार (Disease), कॅन्सर, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, अस्वस्थ वजन, त्याचबरोबर गुडघ्यांचे दुखणे यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
3.मीठ :
भाजीपासून ते भातापर्यंत प्रत्येक पदार्थांमध्ये आपण मीठ टाकतो. मीटर शिवाय कुठल्याही पदार्थाला चव येत नाही. त्याचबरोबर पदार्थांमध्ये मीठ टाकल्याने पदार्थाला वेगळीच चव येते. परंतु या मिठाचे सेवन जास्त प्रमाणात केलं तर तसे दुष्परिणाम पाहायला मिळतात. गरजेपेक्षा जास्त मिठाचे सेवन केल्यावर हृदयविकारासारख्या अनेक हजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. किचन मध्ये उपलब्ध असलेले मीठ तुमच्या घरात जास्त झाल्यावर तुमचे आरोग्य ढासळू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक व्यक्तीला रोज पाच मिलीग्राम सोडियम पेक्षा कमी मिठाचे सेवन केले पाहिजे.
4. व्हाईट ब्रेड :
अनेक लोकांचा सकाळचा नाष्टा हा वाईट ब्रेड किंवा पावापासून सुरू होतो. परंतु सतत वाईट ब्रेडच्या सेवनाने तुमचे आरोग्य ढासळू शकते. व्हाईट ब्रेडच्या जास्त सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि इंडायझेशनच्या समस्या उद्भवतात. व्हाईट बेड सुद्धा मैद्यापासून बनवलेली असते ज्यामध्ये फायबर, विटामिन आणि मिनरलचे कमी गुणधर्म असतात. व्हाईट बेडच्या नियमित सेवनाने वजन वाढणे आणि पोटासंबंधितचे आजार होऊ शकतात.
5. साखर (Sugar) :
प्रत्येकाच्या घरामध्ये साखरेचे सेवन केले जाते. चहा पासून ते शिऱ्यापर्यंत आपण साखरेचा वापर करतो. परंतु साखर जर जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात गेली तर तसेच स्लो पॉयझन तयार होते. साखर भरपूर प्रमाणात रिफाइंड करून येते. त्यामुळे त्यामधील सगळे पोषक तत्व नष्ट होऊन जातात. त्याचबरोबर साखरेमध्ये उपलब्ध असलेली कॅलरी ब्लड शुगर वाढवते. त्याचबरोबर साखरेमध्ये उपलब्ध असणारे कार्बोहाइड्रेट तुमचं वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.