Sugar Substitutes saam tv
लाईफस्टाईल

Sugar Substitutes: साखरेच्या जागी आजचं खाण्यास सुरुवात करा हे 5 पदार्थ; वजन आणि शुगर दोन्ही राहील कंट्रोलमध्ये

Natural sugar substitutes: रिफाइंड साखरेचं प्रमाण कमी करायचंय? स्टीव्हिया, गूळ, खजूर, मध आणि खडी साखर हे पर्याय कसे वापरता येतील, त्यांचे फायदे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळच्या चहापासून रात्रीच्या गोड पदार्थापर्यंत आपल्या रोजच्या आहारात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. गोड पदार्थ आवडत असूनही आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर रोजच्या आहारातील रिफाइंड म्हणजेच पांढऱ्या साखरेचं प्रमाण कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच टाइप-२ डायबेटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे चहात, कॉफीत किंवा पदार्थांमध्ये साखरेऐवजी काही पर्याय वापरता येतात. मात्र, नैसर्गिक पर्याय म्हणजे ते अमर्याद प्रमाणात खाता येतील असं नाही. प्रत्येक पर्यायाचं प्रमाण आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. साखरेऐवजी वापरता येणारे असे ५ पर्याय कोणते ते जाणून घेऊया.

स्टीव्हिया- कमी कॅलरीचा पर्याय

स्टीव्हिया हे एका वनस्पतीच्या पानांपासून तयार केले जाणारे नैसर्गिक स्वीटनर आहे. भारतात याला काही ठिकाणी ‘गोड तुळस’ असंही म्हटलं जातं. साखरेच्या तुलनेत स्टीव्हिया खूप गोड असते आणि त्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अत्यंत कमी असते.

याचा फायदा काय?

साखरेऐवजी स्टीव्हियाचा वापर केल्याने आहारातील अतिरिक्त कॅलरी कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक पर्याय ठरू शकतो. तसंच साखरेच्या तुलनेत रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम कमी असतो त्यामुळे डायबेटीस असलेल्या व्यक्तींनाही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करता येऊ शकतो.

गूळ

साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याची पद्धत आपल्या घरांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. गूळ हा उसाच्या रसापासून तयार केला जातो आणि त्यामध्ये साखरेच्या तुलनेत काही खनिजं आणि इतर पोषक घटक शिल्लक राहतात.

गुळामध्ये काय असतं?

गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी काही खनिजं आढळतात. त्यामुळे रिफाइंड साखरेच्या तुलनेत गुळामधून काही पोषक घटक मिळतात. गूळ शरीराला पटकन ऊर्जा देतो आणि अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो.

खजूर

गोड खाण्याची इच्छा झाली तर खजूर हा आणखी एक पर्याय ठरू शकतो. खजूरामध्ये नैसर्गिक साखरेसोबत फायबर, काही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

खजूर का खावा?

खजुरामधील फायबरमुळे त्यातील नैसर्गिक साखर शरीरात शोषली जाण्याची प्रक्रिया तुलनेने हळू होऊ शकते. त्यामुळे साध्या साखरेच्या तुलनेत हा वेगळा पर्याय आहे. खजूर शरीराला ऊर्जा देतो आणि आहारात फायबर वाढवण्यासही मदत करू शकतो.

कसा वापराल?

खजूराची बी काढून त्याची पेस्ट बनवता येते. बाजारात मिळणाऱ्या डेट्स पावडरचाही वापर करता येतो. केक, शेक, स्मूदी, हलवा आणि इतर गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी खजूराची पेस्ट किंवा पावडर वापरता येते.

शुद्ध मध

रिफाइंड साखरेऐवजी मर्यादित प्रमाणात मधाचाही वापर केला जातो. विशेषतः कच्च्या किंवा कमी प्रक्रिया केलेल्या मधामध्ये काही अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. मधामध्ये काही जंतुरोधक आणि दाह कमी करण्यास मदत करणारे गुणधर्मही आढळतात.

खडी साखर

चहा किंवा दुधामध्ये गूळ किंवा मधाचा स्वाद आवडत नसेल, तर काही जण खडी साखर वापरतात. मोठ्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळणाऱ्या धाग्याच्या मिश्रीचा पारंपरिक पद्धतीने वापर केला जातो. खडी साखरेला अनेक घरांमध्ये साखरेपेक्षा हलका पर्याय मानले जाते. काही ठिकाणी ती पचनास सोपी आणि शरीराला थंडावा देते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Maharashtra Farmer : २ एकरात ३ पिके अन् १५ लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याचा 'हा' फॉर्म्युला पाहून कृषी तज्ञही चक्रावले

SCROLL FOR NEXT