Stain Removal Tips from Clothes
Stain Removal Tips from Clothes Saam Tv
लाईफस्टाईल

Stain Removal Tips from Clothes : कपडयांवरील चिवट डाग काढायचे आहे ? 'या' 5 टिप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

Stain Removal Tips from Clothes : आपल्या सगळ्यांना महागडे कपडे घालण्याची चांगलीच हाऊस असते. अशातच कुठे बाहेर जायचं असेल तर आपण चांगल्या दर्जाचे कपडे घातलो. प्रत्येकजण आपण चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करत असतात. अशातच चांगल्या दर्जाच्या कपड्यांमुळे आपल्या पर्सनॅलिटीची वेगळीच छाप पडते.

परंतु, कधी खाताना किंवा चुकून आपल्या कपड्यांवर डाग पडले तर आपल्याला फार वाईट वाटू लागते. महागातला साबण वापरुनही डाग काही जात नाही.

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांच्या कपड्यांवर कधीच न निघणारे चिवट डाग पाहायला मिळतात. ते कपडे कितीही घासले तरीसुद्धा ते डाग निघत नाहीत. लहान मुलांचे मातीत माखलेले कपडे असो किंवा डाळ, भाजी अशा खाद्यजनक पदार्थांचे तेलाचे डाग असो. असे चिवट डागांचे कपडे प्रदान करून आपल्याला घराबाहेर पडता येत नाही.

कपड्यांवरचे डाग घालवण्यासाठी ती जागा जास्त प्रमाणात घासली जाते आणि त्यामुळे कपडा फाटण्याची देखील शक्यता असते. अशावेळी काय करायला हवे हे जाणून घेऊया.

  • कपड्यांवरचे डाग एका मिनिटांमध्ये गायब करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता. लिंबूचे दोन भाग करून त्यावरती मीठ घेऊन जिथे डाग असेल त्याजागी चांगले घासावे. एवढंच नाही तर मिठामध्ये तुम्ही अल्कोहोल सुद्धा मिक्स करू शकता. अशाने तुमच्या कपड्यांवरील डाग चुटकीसरशी नाहीसे होतील.

  • त्याचबरोबर तुम्ही दहीने सुद्धा कपड्यांवरील डाग घालवू शकता. आंबट दह्यात डाग लागलेली कपडे काही मिनिटे भिजत ठेवायची आणि त्यानंतर ती कपडे हाताने व्यवस्थित चोळून घ्यायची. अशाने तुमची कपडे पुन्हा नव्याने चमकतील.

Stain Removal Tips from Clothes
  • तुम्ही कोमट पाण्यातसुद्धा डाग लागलेली कपडे भिजत ठेवू शकता. नंतर साबण किंवा डिटर्जंटच्या सहाय्याने कपडे व्यवस्थित धुवून पुन्हा नव्यासारखे कपडे मिळवू शकता.

  • डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर देखील करु शकता. कपड्यांचे चिवट डाग घालवण्यास बेकिंग सोडा मदत करतो. यासाठी पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून जास्तीत जास्त वीस मिनिटे कपडे भिजत ठेवा आणि त्यानंतर नेहमीसारखी कपडे धुऊन घ्यावी. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपड्यांवरची निघून गेलेली चमक पुन्हा आणू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोल्हापुरात शरद पवार गटाच्या जयकुमार शिंदेंनी दिला राजीनामा

Solo Trip: लग्नानंतर सोलो ट्रीपला जाण्याचे फायदे जाणून घ्या ?

T-20 World Cup 2024: T-20 WC स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या संघासोबत करणार दोन हात

Effects of Fruit Juice: उन्हाळ्यात फळांचा ज्यूस पिताय? जाणून घ्या दुष्परिणाम

Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणांची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT