Career Options After SSC (10th Class) For Students Saam TV
लाईफस्टाईल

Career After 10th: दहावीनंतर पुढे काय? विद्यार्थ्यापुढे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज २७ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचे वर्ष हा आयुष्याचा टर्निंग पॉइंट असते. त्यामुळे दहावीचा चांगले मार्क्स मिळवणे खूप महत्त्वाचे असते. दहावीनंतर काय करिअर करावे, कोणत्या क्षेत्रात करावे, याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो. दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्ग खुले असतात. आज आम्ही तुम्हाला दहावीनंतर करिअरच्या संधीची माहिती देणार आहोत.

करिअर निवडताना सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आवड आणि इच्छा. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, त्याचे क्षेत्रात तुम्ही अॅडमिशन घ्या. भविष्यात तुमच्या करिअरला किती संधी आहे, याचा योग्य विचार करा मगच अॅडमिशन घ्या. ज्या क्षेत्रात भविष्यात खूप संधी उपलब्ध असतील, प्रगतीसाठी पर्याय असतील आणि तुमची आवड असेल त्याच क्षेत्रात करिअर करा.

दहावीनंतर आर्ट्स्, सायन्स, कॉमर्स किंवा डिप्लोमा असे पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असतात.

सायन्स

जर तुम्हाला मेडिकल इंजिनियरिंग या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्हाला सायन्समध्ये अॅडमिशन घ्यावे लागेल. तुम्हाला अॅग्रीकल्चर, मेडिसीन, डिफेन्स सर्व्हिस किंवा मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करायची आवड असेल तर सायन्समध्ये प्रवेश घेऊ शकता.

कॉमर्स

जर तुमचा गणित हा विषय आवडीचा असेल. तुम्हाला भविष्यात बिझनेस करायचा असेल तर तुम्ही कॉमर्स शाखा निवडू शकता. तुम्ही बिझनेस, अकाउंट्स, बॅकिंग, सीए, सीएस अशा परिक्षांचा अभ्यास करु शकता.

आर्ट्स

जर तुम्हाला कोणती कला येत असेल. कला या विषयात आवड असेल तर तुम्हाला करिअरच्या अनेक सधी उपलब्ध आहेत. तुम्हाला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास करता येईल. त्याचसोबत कोणत्या एका विषयाची पदवीदेखील मिळवता येईल. तसेच फाइन आर्ट्स, ग्राफिक्स, अॅनिमेशन, स्क्रिप्ट रायटर, क्रिएटिव्ह डायरेक्टर या पदावर काम करु शकतात.

याचसोबत तुम्ही डिप्लोमा करु शकता. डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला इंजिनियरिंगमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

SCROLL FOR NEXT