Eyes Pain Problem Saam TV
लाईफस्टाईल

Eyes Pain : तुमचे डोळे सतत दुखतात का ? जाणून घ्या कारण

अनेक वेळा डोळे आणि डोके दुखीमुळे इतके असह्य वेदना होतात की त्यावेळी कोणत्याच कामामध्ये मन रमत नाही.

Jagdish Patil

Eyes Pain: सध्याच्या काळातील वाढता मोबाईलचा वापर आणि TV पाहण्यामुळे असो वा लॅपटॉपवर सतत काम करण्यामुळे डोके आणि डोळे (Head and Eyes) दुखीची समस्या ही तशी सामान्य बाब आहेत. डोळे आणि डोके दुखीच्या समस्यने प्रत्येकजण हैराण आहे.

कधी कधी लहान मुलांमध्ये देखील डोळे (Eye) दुखण्याची समस्या जाणवते. शिवाय फक्त डोळे दुखत असतील तर त्यासाठी डोळ्यांची तपासणी करायलाच हवी. मात्र, डोळ्यांसोबत जर डोकेही दुखत असेल तर त्याची इतरही अनेक कारणे असू शकतात.

अनेक वेळा डोळे आणि डोके दुखीमुळे इतके असह्य वेदना होतात की त्यावेळी कोणत्याच कामामध्ये आपलं मन रमत नाही. डोके आणि डोळे दुखण्याचा त्रास हा प्रामुख्याने मायग्रेन (Migraine) कामाचा तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. या समस्येची नक्की कारण काय असतात हे जाणून घेऊया -

डोळे आणि डोकेदुखीची कारणे खालीलप्रमाणे -

1) मायग्रेन- जर डोक्याच्या एका बाजूला तर कधी डोळ्याच्या मागील भाग खूप दुखत असेल तर ते मायग्रेनची लक्षणं असण्याची शक्यता असते. कधीकधी हे दुखणं ७२ तासांपर्यंत राहू शकतं. यावेळी मळमळ होणं, नाक वाहणे किंवा रक्तसंचय असे देखील वाटू शकते. शिवाय यावेळी प्रकाश, आवाज किंवा कोणत्याही वासाची अॅलर्जी होऊ शकते.

2) सायनस- कधी कधी डोळे आणि डोके दुखण्याचे कारण सायनस इन्फेक्शन हे देखील असू शकतं. सायनसमध्ये डोळे, कपाळ, गाल, नाक आणि वरच्या दातांमध्ये वेदना होऊ शकतात. ही वेदना तुम्हाला दिवसभरात अनेक वेळा त्रास देऊ शकते.

3) तणाव- जे लोक खूप तणावाखाली (Stress) राहतात, अशा वेदना त्यांना त्रास देतात. तणावामुळे होणारी वेदना ही डोक्याच्या दोन्ही बाजूंसह डोक्याच्या समोरील भागासह डोळ्यांच्या मागे वेदना होतात. तणावग्रस्त डोकेदुखी बहुतेकदा स्त्रियांमध्ये होते. या वेळी हे दुखण अर्ध्या तासापासून काही तासांपर्यंत टिकू शकते.

4) क्लस्टर डोकेदुखी - कधीकधी क्लस्टर डोके दुखीमध्येही डोळ्याच्या कडेला तीव्र वेदना होतात. यामध्ये प्रामुख्याने हे दुखणे एका डोळ्याभोवती असते. दुखण्यासोबतच डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होण्याची समस्या देखील उद्धभवू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अमरावती जिल्ह्यातील काय स्थिती, कुणाला आघाडी?

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT