Child Care Tips Saam TV
लाईफस्टाईल

Child Care Tips : जेवताना सुद्धा मुलं फोन खेळतात? या टिप्सने वाईट सवयी होतील दूर

Children Yoused Phone While Eating : जेवताना मुलांची फोन पाहण्याची सवय सुटावी म्हणून तुम्ही देखील या काही स्पेशल टिप्स फॉलो करू शकता.

Ruchika Jadhav

जेवताना, खेळताना आणि विविध कामांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी फोन आपल्या हातात पाहिजे असतो. नागरिक अगदी वेड्या सारखे फोन वापरतात. काही घरांमध्ये लहान मुलांनी रडू नये, तसेच शांत एका जागेवर बसून रहावे यासाठी त्यांच्या हातात फोन दिला जातो. फोन नसल्यास मुलं अजिबात घरात थांबत नाहीत आणि जेवणही करत नाहीत. तुमच्या घरी किंवा आजुबाजूला देखील अशी अनेक मुलं असतील. मुलांची ही वाईट सवय सोडवणे प्रत्येक पालकांसाठी एक मोठं आव्हान आहे. मात्र हे अशक्य नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवताना मुलांना फोनची असलेली सवय कशी सोडायची याची माहितीसांगणार आहोत.

फोन ऐवजी टीव्ही

फोनचं अॅडिक्शन लवकर लागतं. मात्र टीव्हीची इतकी जास्त सवय लगेच होत नाही. त्यामुळे तुमची मुलं जेवताना त्यांना फोन ऐवजी टीव्ही दाखवा. टिव्हीमुळे त्यांच्यात आणि गॅजेटमध्ये बरंच अंतर राहतं. यामुळे फोनची सवय सुटेल.

वेळ ठरवा

यावर आणखी एक उपाय म्हणजे मुलांना फोन देताना त्यावर टायमर लावा. फोनमध्ये टायमर लावून फोन मुलांच्या हातात द्या. टायमर वाजला की फोन मुलांच्या हातून काढून घ्या. अशा पद्धतीने वेळ हळूहळू कमी करा. त्याने मुलांना कमी वेळात फोन पाहण्याची सवय होईल. तसेच नंतर एक दिवस आड त्यांना फोन पाहण्यासाठी द्या.

स्क्रिनमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

सतत स्क्रिन पाहिल्याने याचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. लहान मुलं जेवताना देखील स्क्रिन पाहतात त्यावेळी त्यांच्या मेंदूचे पूर्णता स्क्रिनवर लक्ष असते. असे असल्याने मेंदूला आपण काय खात आहोत त्याची चव जाणवत असली तरी त्यावर काय करावे हे समजत नाही. काय खावे आणि काय खाऊ नये हे देखील समजत नाही. मुलं कोणतेही पदार्थ भरवल्यास ते खातात. त्यांना तिखट, खारट आणि आंबट काही समजत नाही. इतकेच नाही तर आपले पोट भरले आहे की नाही याबद्दल देखील त्यांचा मेंदू विचार करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT