Surya Grahan 2023 saam tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2023 : वर्षातील दूसरे सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या सविस्तर

Surya Grahan 2023 Date in India : वर्षातील दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी आहे.

कोमल दामुद्रे

Solar Eclipse 2023 :

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अधिक शुभ मानले जात नाही. म्हणून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. २०२३ मध्ये ४ ग्रहण असणार आहेत. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहण आहेत.

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण हे भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला होणार आहे. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी रात्री ८.३४ वाजता सुरु होणार असून मध्यरात्री ०२.२५ वाजता संपणार आहे.

1. कुठे दिसेल हे सूर्यग्रहण

वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan) हे भारतात (India) दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ पाळू नये असे सांगण्यात येत आहे. या सूर्यग्रहणाचा विशेष प्रभाव हा परदेशात म्हणजेच ब्राझील, पॅराग्वे, जमैका, हैती, अमेरिका, डोमिनिका, चिली, बहामास, कॅनडा, अर्जेंटिना, कोलंबिया, मेक्सिको, क्युबा, बार्बाडोस, अँटिग्वा इत्यादी देशांमध्ये दिसणार आहे.

2. सूर्यग्रहण कालावधी?

यंदा सूर्यग्रहण हे ६ तास ९ मिनिटे असणार आहे. तसेच आश्विन शुक्ल प्रतिपदा ही तिथी देखील सुरु होत आहे. त्यामुळे दूर्गादेवीचे (Durga Devi) आगमन देखील या दिवशी होईल.

3. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो तेव्हा सूर्यग्रहणाच्या वेळी एक वलय तयार होते, त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हटले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT