deep vein thrombosis symptoms saam tv
लाईफस्टाईल

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

deep vein thrombosis symptoms: दीर्घकाळ बसून काम करणं आणि धूम्रपानाच्या सवयींमुळे डीप वेन थ्रॉम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझमचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत धूम्रपान करणं आणि तासन्‌तास एकाच ठिकाणी बसून काम करणं या सवयी केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाहीत तर त्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या दोन्ही गोष्टींमुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे डीप वेन थ्रॉम्बोसिस तसंच पल्मोनरी एम्बोलिझम यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. डॉ. जावेद तडवी यांनी सांगितलं की, धूम्रपान आणि दीर्घकाळ डेस्कवर बसून काम करण्याच्या सवयींमुळे ब्लड क्लॉट्सची समस्या वाढताना दिसतात. पूर्वी डीप वेन थ्रॉम्बोसिस हा आजार प्रामुख्याने वयोवृद्ध किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये आढळत होता. मात्र आता २३ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्येही DVT चं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. शारीरिक हालचालींचा अभाव आणि सतत बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.

डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणजे काय?

डीव्हीटीमध्ये पायांच्या नसांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. या परिस्थितीमुळे ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ही गाठ फुटून फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास पल्मोनरी एम्बोलिझम होण्याचा धोका असतो. ही परिस्थिती जीवघेणी देखील ठरू शकते. वर्क फ्रॉम होमची वाढती पद्धत, लॅपटॉपवर दीर्घकाळ काम, लांबचा प्रवास आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकजण तासन्‌तास एकाच स्थितीत बसून राहतात. शिवाय यामध्ये धुम्रपानाची सवय असल्यास हा धोका आणखी वाढतो.

धूम्रपान आणि दीर्घकाळ बसून राहण्याची सवय केवळ लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब वाढवत नाही, तर रक्त अधिक घट्ट होण्यास कारणीभूत ठरते आणि नसांच्या आतील आवरणालाही हानी पोहोचवते. परिणामी पायांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता वाढते.

लक्षणं काय दिसून येतात?

  • पाय दुखणं

  • सूज येणं

  • उष्णता जाणवणं

  • लालसरपणा

काही वेळा लक्षणे अतिशय सौम्य असतात किंवा अजिबात जाणवत नाहीत, त्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतो. मात्र ही गाठ फुफ्फुसांपर्यंत गेल्यास श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, अचानक बेशुद्ध पडणं किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते.

आता डीव्हीटी हा आजार केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. २३ ते ४५ वयोगटातील दीर्घकाळ बसून काम करणारे आणि नियमित धूम्रपान करणाऱ्या तरुणांमध्ये डीप वेन थ्रॉम्बोसिसची समस्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्याचं दिसतं. उपचारांसाठी येणाऱ्या दर महिन्याला १० रुग्णांपैकी सुमारे ५ रुग्ण पायातील वेदना, सूज, उष्णता आणि लालसरपणाच्या तक्रारी घेऊन येतात आणि त्यांना तातडीच्या उपचारांची गरज भासते.

वेळीच निदान आणि प्रतिबंध महत्त्वाचा

तज्ज्ञांच्या मते, डीव्हीटीचे वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य आहेत. यामध्ये रक्त पातळ करणारी औषधं, कंप्रेशन थेरपी तसंच काही रुग्णांमध्ये आधुनिक व्हॅस्क्युलर उपचारांचा समावेश होतो. मात्र उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असल्याचा महत्त्वपूर्ण सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

प्रतिबंधासाठी काय केलं पाहिजे?

धूम्रपान पूर्णपणे टाळणं हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. दर तासाभराने थोडं चालणं किंवा हलका फेरफटका मारणं आवश्यक आहे. दीर्घकाळ बसून काम करत असल्यास कंप्रेशन स्टॉकिंग्सचा वापर फायदेशीर ठरू शकतो. पुरेसं पाणी पिणं, वजन नियंत्रणात ठेवणं आणि नियमित व्यायामाची सवय लावणं यामुळे धोका कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

Maharashtra News Live Update: अमरावती विद्यापीठात बॅटरीच्या स्फोटाने आग; तीन दुचाकी जळून खाक

Fenugreek Seeds: वजन ते शुगर कंट्रोल...; मेथीच्या दाण्यांचे हे ९ अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

Maharashtra Water Cut: मोठी बातमी! संपूर्ण राज्यात १० टक्के पाणी कपात, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT