World Laughter Day 2023
World Laughter Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Laughter Day 2023 : हसा हसा आणखीन हसा... जागतिक हास्य दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Laughter Day : जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. लोकांना हसण्याची जाणीव व्हावी हा हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे. हसणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

माणसाने नेहमी हसले पाहिजे. कारण हसण्याने माणसातील बालिशपणा जागृत होतो तसेच मनाला शांती मिळते. यावर्षी 7 मे रोजी जागतिक हास्य दिन साजरा केला जाणार आहे. जागतिक हास्य दिन का साजरा (Celebrate) केला जातो ते जाणून घेऊया.

इतिहास -

आपणास सांगूया की जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतात (India) झाली. 10 मे 1998 रोजी मुंबईत पहिल्यांदा साजरा करण्यात आला. जागतिक हास्य दिनाची सुरुवात लाफ्टर योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली. तेव्हापासून दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हास्याद्वारे लोकांमध्ये बंधुभाव वाढवणे हा आहे.

महत्त्व -

डॉक्टरांच्या मते प्रत्येक माणसाने हसणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक माणूस हसल्याशिवाय अपूर्ण असतो. हसल्याने रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कमी होते. याशिवाय हसल्याने मनाला शांती मिळते. हसल्याने वेदना कमी होतात.

थीम -

दरवर्षी वेगळ्या थीमने जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी हशा पिकवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोकांना हसावे आणि आनंदी व्हावे या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची थीम साजरी केली जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

SCROLL FOR NEXT