Smartwatch Benefits Saam tv
लाईफस्टाईल

Smartwatch Benefits : काय सांगता ! स्मार्टवॉचमुळे होणार उतारवयातील 'या' भयंकर आजारांचे निदान, संशोधनातून सिद्ध

Smartwatch Advantages : स्मार्टवॉचच्या वापरामुळे आपल्याला आरोग्याची खरेच काळजी घेता येते का?

कोमल दामुद्रे

Parkinson's Diagnosis : सध्या बाजारात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक इलेक्ट्रिक उपकरणे तयार करण्यात आली आहे. त्यातील एक स्मार्टवॉच. हल्ली प्रत्येकाकडे या महागडे स्मार्टवॉच पाहायला मिळते.

स्मार्टवॉचच्या वापरामुळे आपल्याला आरोग्याची खरेच काळजी घेता येते का ? परंतु, कार्डिफ विद्यापीठातील यूके डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूट टीमने संशोधन केल्यानंतर असे समोर आले की, स्मार्टवॉचमुळे आपल्याला कोणत्या आजारांचे निदान झाले आहे ते लगेच कळते. तसेच त्यांनी म्हटले की, स्मार्टवॉचमुळे सात वर्षापर्यंत पार्किन्सनच्या आजाराची लक्षणे दिसून येतात.

1. पार्किन्सन आजार म्हणजे काय ?

पार्किन्सन्स रोग हा एक प्रकारचा हालचाल विकार आहे ज्यामध्ये हात किंवा पायातून मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या नसा काम करणे बंद करतात. हे अनुवांशिक कारणांमुळे तसेच पर्यावरणातील बदलामुळे होते. हा आजार (Disease) शरीरात हळूहळू होतो, त्यामुळे त्याची लक्षणे अनेक वेळा ओळखणे कठीण होते. शहरातील दहा मेंदू रुग्णांपैकी एक हा पार्किन्सन आजाराचा बळी आहे.

कार्डिफ विद्यापीठातील यूके डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूट टीमने 103,712 स्मार्टवॉच परिधान करणार्‍यांच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी स्मार्टवॉचचा (Smartwatch) वापर केला. त्यातून असे कळाले की, २०१३ ते २०१६ दरम्यान एका आठवड्यात त्यांच्या हालचालींच्या गतीचा मागोवा घेऊन, ते पार्किन्सन्स विकसित होईल याचा अंदाज लावू शकले.

2. याची लक्षणे कोणती ?

  • पापण्या लुकलुकण्याचा वेग मंदावणे.

  • हात पाय थरथर कापणे, चेहऱ्यावर (Face) कोणतेच भाव नसणे.

  • चालताना, लहान पावले उचला आणि खाली वाकवा.

  • वारंवार गोंधळ, श्रवणशक्ती कमी होणे.

  • जास्त घाम येणे, उदासीनता, गोष्टी लक्षात न राहणे.

  • चालताना व्यक्तीचे लक्षात न राहाणे.

  • आवाज कमी होणे.

3. संशोधनातून हे समोर आले

युनायटेड किंगडममधील लोकसंख्यापैकी सुमारे ३० टक्के लोक स्मार्टवॉचचा वापर करतात. असे डॉ. सिंथिया सँडर म्हणाल्या. त्यांच्या मते, यामुळे या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होते ज्याच्यामुळे त्यावर उपचार करणे सोपे होते.

उतार वयात आपल्या शरीरातील अनेक गोष्टी बदलतात ज्यामुळे कमजोरी व हालचालींवर परिणाम करणाऱ्या पार्किन्सन्सचा फरक अचूक असल्याचे दिसून येते. तसेच पार्किन्सन्स रोगाचे निदान झालेल्या व्यक्तीचे परिणामही वेगळे दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT