स्मार्टफोन निर्माती POCO कंपनी या वर्षाच्या सुरुवातीस POCO X5 5G सीरिज लॉन्च केली होती. यात स्मार्टफोन- POCO X5 5G आणि POCO X5 Pro 5G चा समावेश होता. आता कंपनीने यापुढील आवृत्ती लॉन्च करणार आहे. कंपनी POCO X6 Pro 5G हा फोन लॉन्च करणार आहे. (Latest News)
या फोनमध्ये NBTC आणि BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहण्यात आला असून हा फोन कधी लॉन्च होणार याचीही माहिती देण्यात आलीय. Poco X6 Pro 5G हा Redmi K70E चा प्रकार म्हणून लॉन्च करणार असल्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या Poco X5 Pro ला मिळालेलं यश पाहून कंपनीने या सीरिजमधील पुढील आवृत्ती आणण्याचं ठरवलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान Xiaomi सब-ब्रँडने Poco X6 Pro 5G च्याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाहीये. परंतु Poco X6 Pro 5G ची नवीन अपडेट माहिती समोर आलीय. या फोनमध्ये रॅम आणि स्टोरेज किती असणार याची माहिती समोर आलीय. हा फोन ५जी ला सपोर्ट करणारा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु पुढील जानेवारीच्या सुरुवातीला लॉन्च होईल, असं सांगण्यात येत आहे.
POCO X6 Pro 5Gची FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर माहिती अपडेट मिळालीय. या फोनला 2311DRK48G मॉडल नंबर पाहण्यात आलंय. या फोनमध्ये दोन स्टोरेज कॉन्फिगरेशन देण्यात आलेत. यातील एक 8GB रॅम दिली असून त्यात 256GB स्टोरेजदेखील देण्यात आलाय. यासह दुसऱ्या फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आलंय.
OCO X6 Pro 5Gमध्ये Xiaomi HyperOS 1.0 अपडेट देण्यात आलंय. विशेष म्हणजे हा फोन 67W ने फास्ट चार्जिंग सपोर्ट देतो. POCO X6 Pro 5G Redmi K70e ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती असेल असं सांगण्यात येत आहे. जर हा फोन Redmi K70e च्या रीब्रँडिंगसह येणार असेल, तर या फोनाला ६.६७ इंच १.५K OLED डिस्प्ले, १२० Hz डिस्प्ले १,८०० युनिट्स पीक ब्राइटनेससह देण्यात येईल. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८३०० अल्ट्रा प्रोसेसर, ६४ मेगापिक्सेल ओआयएस मुख्य कॅमेरा असेल तर 16GB पर्यंत LPDDR5X रॅम मिळेल. या फोनची बॅटरी ५,५०० mAh देण्यात आली असून हा फोन लवकर चार्ज होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.