सध्या सर्वजण कोणत्या न कोणत्या स्किममध्ये गुंतवणूक करतात. या स्किममध्ये गुंतवणूक करताना अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्याचसंबंधित वित्त मंत्रालयाने एक मोठी सूचना जारी केली आहे. लहान बचत योजनांमध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड देणे अनिवार्य असणार आहे.
३१ मार्च २०२३ रोजी वित्त मंत्रालयाने यासंबंधित मोठी सूचना दिली आहे. ज्यात जर तुम्ही कोणत्याही लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडले असेल तर तुम्हाला केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत खातेधारकांना ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
कोणाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड सबमिट करणे आवश्यक
वित्त मंत्रालयाच्या सुचनेनुसार, स्मॉल सेव्हिंग स्किमच्या अंतर्गत खाते उघडले असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड सादर केले नसतील तर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देणे बंधनकारक आहे.
कोणाला आधार कार्ड देणे आवश्यक नाही
कॅनरा बँकेच्या वेबसाईटनुसार,१ एप्रिलपासून स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेधारकांना पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे. त्यानुसार १ एप्रिलनंतर ज्यांनी खाते उघडले असेल त्यांना आधार आणि पॅन कार्ड सबमिट करणे आवश्यक आहे.
लिंक न केल्यास परिणाम
आधार आणि पॅन कार्ड खात्याशी लिंक केले नसेल तर ३० सप्टेंबर २०२३नंतर तुमचे स्मॉल सेव्हिंग स्किमचे खाते निष्क्रिय केले जाईल. जोपर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड सबमिट करत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन होणार नाही.
पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये एफडी, आरडी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, सुकन्या समृद्धी योजना, टीडी, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र (KVP) या योजनांचा समावेश यामध्ये आहे. या खातेधारकांना आधार आणि पॅन कार्ड सबमिट करणे अनिवार्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.