लहान मुलं आजकाल सर्रास मोबाईलचा वापर करतात. मोठ्या व्यक्तींपेक्षा जास्त मुलांना सध्या स्मार्टफोनमधल्या गोष्टी समजू लागल्या आहेत. अनेक पालक देखील कोणताही न विचार करता मुलांच्या हातात फोन देऊन मोकळे होतात. यावेळी फोनमध्ये मुलं काय करतायत, कोणत्या गोष्टी पाहतायत याकडे लक्ष दिलं पाहिजे. मोबाईल हातात आल्यावर युट्यूब उघडून मुलं समोर येतील ते व्हिडीओ पाहतात. यामध्ये काही व्हिडीओ हे गाणी किंवा आयटम साँग्सचेही असतात.
आयटम साँग आणि इतर गाण्यांचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे मुलं वेळेपूर्वीच मोठी होतं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे मुलं या गाण्यांमध्ये दाखवलेल्या गोष्टींचं अनुकरण करतात, जे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरतं.
नागपूरमधील बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रीतम चांडक यांनी मुलांच्या आरोग्यावर अशा गाण्यांचा कसा परिणाम होतो याबाबत माहिती दिली आहे. डॉ. चांडक म्हणाले की, आयटम साँग्समध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या मुलांनी पूर्वी कधीही पाहिलेल्या नसतात. अशावेळी या गोष्टी करून पाहण्याची त्यांची उत्सुकता वाढू लागते. काहीवेळा या गाण्यांमध्ये चुकीच्या गोष्टी देखील दाखवल्या जातात. या गोष्टी पाहिल्यानंतर मुलं त्याचं अनुकरण करू लागतात. यावेळी मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती, आक्रामता वाढू लागते. शिवाय यामुळे मुलं आकाली मोठी होतायत.
आयटम साँग्सचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. यामुळे मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती, आक्रामता वाढण्याचा धोका असतो.डॉ. प्रितम चांडक, बाल मानसोपचारपतज्ज्ञ
अशा पद्धतीची गाणी पाहून लहान मुलांमध्ये हार्मोनल चेंजेसही होऊ लागतात. त्याचप्रमाणे या गाण्यांच्या परिणाम मुलांवर इतका होतो की, काही मुलं अश्लील कृत्य देखील करू लागतात. अशावेळी पालकांनी यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे. मुलं अशा गोष्टी पाहणार नाहीत, याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. जर वेळी मुलांच्या अशा कृत्यांवर आळा घातला नाही तर मुलांमध्ये पॅनिक अटॅक, अग्रेशन, चिडचिडेपणा वाढण्याचा धोका असतो, असंही डॉ. चांडक यांनी सांगितलं आहे.
आजकाल अनेक पालक त्यांच्या मुलांनी वयासाठी योग्य नसलेल्या गाण्यांवर डान्स करण्यास सांगतात. आश्चर्याची बाब म्हणजे पालकांना यामध्ये काही गैर वाटत नाही. घरात किंवा पार्ट्यांमध्ये अशी गाणी वाजवली जातात तेव्हा मुलंही त्यावर डान्सही करतात. प्रौढ त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अशा गाण्यांचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो, हे समजून घेतलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.