Sleeping Position Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping Position : रात्री झोपताना 'या' कुशीवर झोपा, वजन झपाट्याने होईल कमी

रात्री जेवण केल्यानंतर कोणत्या स्थितीत झोपावे आणि त्याचे फायदे काय आहेत.

कोमल दामुद्रे

Sleeping Position : सध्याच्या धावपळीच्या जगात निरोगी राहणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. चांगली जीवनशैली आणि उत्तम आहार दिनचर्यासोबत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

चांगला आहार आणि सक्रिय असूनही आपण आजारांना सहज बळी पडतो. या वातावरणात आरोग्याची अतिरिक्त काळजी (Care) घेणे आवश्यक असते. सहसा आपण जेवणापूर्वी किंवा जेवल्यानंतर अनेक चुका करतो.

खरं तर, रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याची कोणती स्थिती योग्य आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया, रात्री जेवण केल्यानंतर कोणत्या स्थितीत झोपावे आणि त्याचे फायदे (Benefits) काय आहेत. (Weight Loss Tips In Marathi)

रात्रीच्या जेवणानंतर या स्थितीत झोपा

रात्री जेवल्यानंतर लगेच बसू नये किंवा झोपू नये. या चुकीमुळे खाल्लेल्या अन्नामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर थोडे चालावे आणि सुमारे 2 तासांनी झोपावे. अन्न खाल्ल्यानंतर नेहमी डाव्या बाजूला झोपावे. याशिवाय पोटावर झोपणे देखील फायदेशीर आहे.

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

डाव्या कुशीवर झोपल्यास त्याचा पचनावर परिणाम होत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते. रात्रीच्या जेवणानंतर योग्य स्थितीत झोप न घेतल्याने आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होऊ शकते. अशा स्थितीत नेहमी डाव्या बाजूला किंवा पोटावर झोपण्याचा प्रयत्न करा.

या रुग्णांसाठीही याचा फायदा होतो

डाव्या कुशीवर झोपणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, हृदयरोगींनी डाव्या कुशीवर झोपल्यास ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या स्थितीत झोपणे उत्तम ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने अन्न खाल्ल्यानंतर दोन तास सक्रिय राहणे आवश्यक आहे, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanemachi waterfall: या विकेंडला धबधब्यावर जायचा विचार करताय? मग अगदी जवळ असलेल्या नानेमाचीचा प्लान करू शकता

Bollywood Celebrity: विम्बल्डनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा मेळावा, पाहा व्हायरल फोटो

Maharashtra Live News Update: उबाठाच्या सहसंपर्क प्रमुखांनी दिला राजीनामा

Snake Bite Remedy : सापाचं विष झटक्यात दूर करणारी वनस्पती कोणती?

Dhanashri Kadgaonkar Photos : वहिनीसाहेबांचा अनोखा अंदाज, हटके स्टाइलचं तुम्हीही कराल कौतुक

SCROLL FOR NEXT