Homemade Remedies For Dark Spot Saam Tv
लाईफस्टाईल

Remedies For Dark Spot: चेहऱ्यावरील डार्क स्पॉटमुळे त्रास होतोय? हे घरगुती उपाय करा ट्राय, डाग होतील चुटकीसरशी गायब

Skin Care: प्रदुषणाच्या त्वचेवर खूप जास्त परिणाम होतो. तसेच जंक फूड, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळांमुळे चेहऱ्यावर पुरळ येणे, डाग येतात. त्यामुळे चेहरा चांगला असण्यासाठी काही घरगुती उपाय करायला हवे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Homemade Remedies For Dark Spot:

प्रदुषणामुळे नागरीकांना खूप जास्त त्रास होत आहेत. त्यात अनेक आजारपण उद्भवतात. झोप न लागणे, मोबाईल, लॅपटॉपवर जास्त वेळ काम करणे यामुळे चेहऱ्यावर अनेक डाग, चट्टे येतात. प्रदुषणामुळे चेहऱ्यावर पिंपल्सदेखील येतात.

बाजारात मिळणारे जंक फूड यामुळेही चेहऱ्यावर परिणाम होतात. एक्जिमा, फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. यामुळे चेहऱ्यावर डाग येतात. त्वचेसंबंधित समस्या येतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करु शकतात. घरगुती पदार्थ वापरुन तुम्ही चेहऱ्यावरील डाग दूर करु शकतात.

बटाटा

बटाटा हा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बटाट्याची साल किसून घ्या. दिवसातून दोन वेळा दहा मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ धुवा. १० दिवस हे केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.

बटाट्याची पेस्ट,चंदन, गुलाबपाणी

गुलाबपाणी आणि चंदन हे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. याचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास खूप फायदे होतात. त्यासाठी बटाट्याच्या पेस्टमध्ये चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून फेसपॅक तयार करा. त्यानंतर चेहऱ्याला लावा. त्यानंतर कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग क्रिम लावा. दिवसातून दोनदा हा फेसपॅक लावल्याने खूप फायदा होतो.

अॅलोवेरा जेल आणि मुलतानी माती

मुलतानी माती आणि कोरफड त्वचेसाठी खूप प्रभावी असते. अॅलोवेरा जेलमध्ये मुलतानी माती, दूध आणि हळद मिसळून त्याचा फेसपॅक तयार केला. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. काही वेळाने चेहरा धुवून घ्या.

लिंबाचा रस, हळद आणि टॉमेटो

टॉमेटो हा चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतो. टॉमेटोची पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात हळद पावडर आणि लिंबाचा रस घला. हा पॅक चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर चेहरा धुवून टाका. यानंतर तुमची त्वचा तजेलदार दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमक

नांदेडच्या लॉजमध्ये आढळला शिक्षकाचा मृतदेह; हत्या ती आत्महत्या? नक्की घडलं काय?

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीची तारखी ठरली, उद्धव ठाकरे-राहुल गांधींमध्ये चर्चा; दिल्लीमध्ये राजकारण तापणार

Breaking : घराला बॉम्बने उडवून टाकू! मित्राचा फोन घेतला अन् केंद्रीय मंत्र्याला धमकी दिली, नागपुरात खळबळ

Chawli Rassa Bhaji Recipe : चवळीला द्या मालवणी तडका, बनवा झणझणीत रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT