Skin Care
Skin Care Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips: चेहऱ्यावर डाग आहेत, ग्लो येत नाहीये, हळद आणि दह्याचे हे उपाय करुन पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हळद आणि दही या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. दह्यामध्ये झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि लॅक्टिक अॅसिड असते. या दोन्ही गोष्टी त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात आणि यामुळे चेहऱ्यावर चमक येते (Home remedies of curd and turmeric for skin care).

दही आणि हळदीचे हे उपाय (Tips) नक्की ट्राय करा -

त्वचेवर ग्लो येण्यासाठी

हळद आणि दह्याच्या वापराने त्वचेवर (Skin Care) चमक येईल. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमसारखे घटक आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. दही, हळद, बेसन आणि गुलाबपाणी एकत्र करुन पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे ठेवा. काही वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.

वृद्धत्वाची समस्या दूर होण्यासाठी

दही आणि हळदीच्या वापरामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणेही कमी होतात. हळद आणि दह्यामध्ये अँटी एजिंद गुणधर्म असतात. दुसरीकडे, हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन सुरकुत्या दूर करते. दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए आणि झिंकचे प्रमाण देखील त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते.

एका भांड्यात एक चमचा हळद, एक चमचा दही, 1 चमचे कोरफडीचे जेल आणि गुलाबपाणीचे काही थेंब एकत्र करुन पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक 15 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवर चमक येईल.

तेलकट त्वचेच्या समस्येसाठी

तेलकट त्वचेच्या समस्येसाठी अंड्याचा पांढरा भाग, दही आणि हळदमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुम आणि तेलकट त्वचेची समस्या दूर होईल. हा पॅक तयार केल्यानंतर 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. अंड्यामध्ये प्रोटीन आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.

चेहऱ्यावरील डागांसाठी

चेहऱ्यावरील डाग हलके करण्यासाठी हळद, दही आणि गुलाबपाण्याच्या मिश्रणात चंदन पावडर मिसळा. आता हा पॅक चेहरा आणि मानेच्या भागावर लावा. फेसपॅक सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. हळदीमध्ये अनेक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुण, अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसेच, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड देखील असते. ते त्वचेला एक्सफोलिएट करते आणि डाग कमी करण्यास मदत करते.

टॅन कमी करण्यासाठी

टॅनच्या समस्येवरही हळद आणि दही लावल्याने फायदा होईल. हळदीमध्ये कर्क्युमिनॉइड नावाचे पॉलिफेनॉल असते, जे त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते. दुसरीकडे, दही त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. एका भांड्यात एक चमचा हळद, एक चमचा दही आणि गुलाबजलाचे काही थेंब एकत्र करा. ते टॅन असलेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा.

जर तुम्हाला हळद किंवा दहीची ऍलर्जी असेल तर ते हे उपाय करु नये.

(टीप- वरील उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी आत्महत्या प्रकरण, हायकोर्टात याचिका

Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Mobile Hack: फोन पाण्यात पडला तर, चुकूनही करु नका हे काम,नाहीतर होईल नुकसान

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT