कॉफी हे एक असे पेय आहे. जे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने करतं असते. बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटत असते. काहींना तर कॉफीच्या वासानेच खूप बरे वाटते. कॉफी दुधामधून पिण्यापेक्षा ब्लॅक कॉफीचे (Black Coffee) अनेक फायदे आहेत. ब्लॅक कॉफीला नेहमी शरीराला खूप हेल्दी मानले जाते. या कॉफीमध्ये कॅलरीचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच यामध्ये कॅल्शियम (Calcium) आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्व देखील असतात. दिवसातून २ कप ब्लॅक कॉफी पिल्यास, तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्याकरिता याचा फायदा होतो. मेंदू देखील तल्लख ठेवण्यासाठी कॉफीचा उपयोग होतो. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा राहाते. तसेच याचे अनेक फायदे आहेत जे आम्ही तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत. (how to make black coffee for weight loss)
ब्लॅक कॉफीचे पोषक तत्व (Nutritional Value Of Black Coffee)
ब्लॅक कॉफी ही तुमच्या शरीराकरिता चांगली पोषक असते. यामुळे तुमच्या शरीराला खूप ऊर्जा मिळते. तर यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम (Potassium) हे पोषक तत्व असल्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये उत्साही राहाता. ब्लॅक कॉफीमध्ये ६० टक्के पोषकतत्व असतात तर केवळ १० टक्के कॅलरीज असतात. शिवाय ब्लॅक कॉफीमध्ये १० टक्के मिनरल्सचा समावेश असतो. यामधील कॅफेन शरीराकरिता अतिशय फायदेशीर ठरते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषक तत्व मिळण्याकरिता तुम्ही केवळ २ कप ब्लॅक कॉफी दिवसभरात प्यायला हवी. (benefits of black coffee without sugar)
हे देखील पहा-
ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Black Coffee)
ब्लॅक कॉफीचे शरीराला वेगवेगळे फायदे होत असतात. कितीतरी वर्षापासून ब्लॅक कॉफीचा उपयोग शरीराच्या फायद्याकरिता करण्यात येत आहे. नक्की याचा उपयोग आपल्याला कसा वेगवेगळ्या तऱ्हेने करता येऊ शकणार आहे हे आपण जाणून घेणार आहे.
1. वजन कमी करण्यासाठी ठरते फायदेशीर
2. स्मरणशक्ती वाढवण्यास होते मदत
3. वर्कआऊट परफॉर्मन्स वाढवण्यास मदत
4. यकृतासाठी ठरतं फायदेशीर
5. मधुमेह दूर राखण्यास मदत होते
6. तणाव कमी करतं
7. पोट साफ करण्यास फायदेशीर
8. अँटिऑक्सिडंट्सचा जास्त प्रभाव
9. अधिक उत्साह
10. अभ्यास करताना झोप आल्यास
ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे सौंदर्यसाठी (Benefits Of Black Coffee For Skin And Hair)
कॉफीचा उपयोग पिण्याकरिता आणि आपला तणाव दूर करण्याकरिता अथवा आरोग्याकरिता चांगला आहे. हे आपल्या सर्वांना चांगलंच माहीत असते. पण ब्लॅक कॉफीचा उपयोग आपल्याला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी देखील करता येऊ शकतो याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे जर ब्लॅक कॉफीचा वापर केले तर तुमची त्वचा देखील अधिक तजेलदार होऊ शकते आणि तुमच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडत असते. तुम्ही हे उपाय घरच्या घरी देखील करू शकता.
त्वचेच्या skin exfoliation साठी फेस स्क्रब (Face Scrub)
त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्याकरिता आणि कोरडी त्वचा परत एकदा मऊ आणि मुलायम करण्याकरिता ब्लॅक कॉफी स्क्रबचा उपयोग करता येतो. या स्क्रबमुळे तुमची त्वचा कोरडी होण्यापासून देखील वाचत असते. हा स्क्रब तयार करणे आणि वापरणे अत्यंत सोपे ठरणार आहे.
मऊ मुलायम त्वचेसाठी कॉफी आणि कोको फेसपॅक (Face Packs For Soft Skin)
तुम्हाला खरे म्हणजे पार्लरप्रमाणे ट्रिटमेंट हवी असेल तर खिशाला कात्री लावायची नसेल तर कॉफी आणि कोको फेसपॅक हा उत्तम उपाय आहे. फक्त याचा वापर करताना तुमची त्वचा तेलकट असल्यास यामध्ये दुधाऐवजी दह्याचा वापर करावे. यामुळे तुमच्या त्वचेला योग्य आणि पोषण मिळते आणि तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास खूप मदत होते. (black coffee benefits and side effects)
सेल्युलाईट नष्ट करण्यासाठी कॉफी स्क्रब (For Cellulite Reduction)
शरीरावर सेल्युलाईट असणे कोणालाच आवडणार नाही. पण हे काढून टाकता येतात. याकरिता कॉफी स्क्रब हा चांगला पर्याय आहे. कॉफी त्वचेला खूप मुलायम करत असते. यामुळे सेल्युलाईट नष्ट करण्याकरिता याचा उपयोग होतो. हे बनवणे अतिशय सोपे आहे. तसेच याचा परिणाम निश्चितरित्या तुमच्या त्वचेवर होणार आहे.
डोळ्याखालील काळ्या वर्तुळांसाठी गुणकारी (Under Eye Dark Circle And Puffy Eyes)
डोळ्याखाली देखील निर्माण झालेली काळी वर्तुळे आणि सूज घालवण्याकरिता कॉफीचा चांगला उपयोग होतो. डिहायड्रेशन, अलर्जी, झोप न होणे या गोष्टी डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याकरिता कारणीभूत ठरणार आहे. कॉफीमधील असलेले कॅफेन या गोष्टी नष्ट करण्यास मदत करत असतात. ब्लॅक कॉफीमध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी काळे डाग कमी करण्याकरिता अतिशय फायदेशीर ठरत असतात. (benefits of drinking black coffee for skin)
त्वचा टाईट करण्यासाठी उपयुक्त (For Skin Tightening)
कॉफीमध्ये असणारे कॅफेन हे त्वचा अधिक टाईट राखण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. त्यामुळेच त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा उत्पादनांमध्ये कॉफीचा अंश असतो. तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करून चेहरा तजेलदार दिसण्यासाठी याचा उपयोग करता येतो. त्यासाठी तुम्ही कॉफी स्क्रब बनवून घ्या.
टॅनिंग काढून टाकण्याकरिता (Repairing UV Damage)
ब्लॅक कॉफीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हे भाजी आणि फळातून मिळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सपेक्षा सर्वात अधिक असतात. यामुळे सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून ब्लॅक कॉफी आपल्या त्वचेचा बचाव करण्याकरिता उपयुक्त ठरत असतात.
त्वचा उजळवण्यासाठी (Skin Brightening)
कॉफीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा अधिक तजेलदार होण्यास आणि उजळवण्यासाठी उपयोग करून घेता येतो. यासाठी जास्त काही कष्ट करायची गरज भासत नाही. घरच्या घरी तुम्ही तुमचा पूर्ववत रंग टिकवून ठेवू शकता.
नैसर्गिक चमकदार केस (Natural Shiny Hair)
केस चमकदार होण्याकरिता आपण खूप प्रयत्न करत असतो. पण कॉफी हा त्यामध्ये सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे. त्याकरिता तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. कॉफी पावडर आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. यामुळे त्याचा उपयोग देखील तुम्ही तुमच्या केसांची चमक परत आणण्याकरिता करू शकणार आहे.
हेअरडाय करण्यासाठी (Hair Dye)
ब्लॅक कॉफीमध्ये असणारे कॅफेन तुमच्या केसांची वाढ देखील चांगले करते आणि केसगळती रोखण्याकरिता मदत करत असते. तसेच याचा उपयोग तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी देखील होतो. ब्लॅक कॉफीमुळे केसांना अधिक गडद रंग मिळत असतो.
स्काल्पसाठी (Scalp Exfoliation)
बऱ्याच जणांना स्काल्पची समस्या खूप असते. पण यावर नक्की काय उपाय करायचा याकरिता त्रस्त झाले असतात. तुमचा कोरडा स्काल्प आणि डेड स्किन काढून टाकण्याकरिता याचा मोठा उपयोग होतो. तसेच त्याकरिता जास्त काही करण्याची गरज लागत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.