Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips: पेडिक्युअर करायला पार्लरमध्ये जाणं विसरा, फळांच्या सालींमुळे १० मिनिटांत चमकतील पाय

Fruits Peel To Clean Blackness: पायांची त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली आहे का? आज आपण पाय स्वच्छ करण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

How To Clean Blackness Of Feet

बहुतेक लोकं त्यांच्या चेहऱ्याची काळजी घेतात, परंतु पायांकडे दुर्लक्ष करतात. पाय हा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अत्यावश्यक भाग आहे. अनेक वेळा पायात टॅनिंगची समस्या उद्भवते. त्यामुळे पायांची त्वचा काळी आणि निस्तेज होऊ (Pedicure) लागते. यासाठी तुम्ही काही फळांच्या सालींचा वापर करू शकता, कारण फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. फळांच्या सालींमध्येही भरपूर पोषक असतात. (latest lifestyle news)

फळांची साले बहुतेक घरांमध्ये फेकून दिली जातात, परंतु त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही फळांची साले वापरू शकता. आज आपण फळांच्या सालीपासून पाय कसे स्वच्छ करायचे, हे आपण जाणून घेऊ (Skin Care Tips) या. यासाठी काही टिप्स आहेत, त्या आपण जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फळांच्या सालींचा वापर

पाय धूळ आणि मातीच्या सर्वाधिक संपर्कात येतात. त्यामुळे पायांची त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज होते. काही फळांच्या सालींचा वापर करून आपण पाय स्वच्छ करू (Feet Pedicure Tips) शकतो.

केळीची साल

केळीची साल चांगली एक्सफोलिएटर म्हणून काम करते. पायांची काळी त्वचा काढून टाकण्यासाठी त्याचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. पिकलेल्या केळ्याची साल (Fruits Peel To Clean Blackness) घ्या. सालीच्या आतील भागात बेकिंग सोडा लावा आणि पाय घासून घ्या. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. यानंतर आपले पाय काही वेळ कोमट पाण्यात ठेवा आणि ते स्वच्छ करा.

पपईच्या सालीमुळे पायाची त्वचा मुलायम होते

पपईची साल देखील तुमचे पाय चमकवू शकते. यासाठी पपईची साल घेऊन छोटे तुकडे करा आणि नंतर त्यात कोरफडीचे जेल आणि मध घालून बारीक करा म्हणजे चांगली पेस्ट तयार (Fruits Peel Uses) होईल. ही पेस्ट पायाला लावा. साधारण 20 मिनिटांनी साध्या पाण्याने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या पायाची त्वचा स्वच्छ होईलच, त्यासोबत ती मऊ देखील होईल.

पाय स्वच्छ करण्यासाठी संत्र्याची साल

तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये संत्र्याच्या सालीचा समावेश करणे, हा एक चांगला पर्याय आहे.कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे. त्वचेचा टोन साफ ​​करण्यासाठी आणि टॅनिंग सारख्या समस्या दूर करण्यात प्रभावी (Blackness Of Feet) आहे. यासाठी संत्र्याची साल सुकवून बारीक करून त्यात कच्चे दूध मिसळा. पायाला लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसंच राहू द्या. ते थोडे सुकल्यावर मसाज करून स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने पायाची काळी त्वचा निघून जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Varvarche Vadhu Var: लग्नाआधी एकदा पाहाचं ! लग्नावरचं हलकं फुलकं, प्रभावी नाटक - 'वरवरचे वधू वर'

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

GK: रडताना डोळ्यांतून अश्रू का बाहेर पडतात? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT