Ganesh Chaturthi Skin Care Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi Skin Care : गणेशोत्सवात गोड अन् चमचमीत खाऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतायत? चिंता सोडा आणि 'या' टिप्स फॉलो करा

Ganesh Chaturthi Skin Care Tips : गणेशोत्सवात तेलकट आणि चमचमीत पदार्थ खाऊन देखील तुमच्या त्वचेवर कोणताही इफेक्ट होणार नाही. त्यासाठी या टिप्स फॉलो करा.

Ruchika Jadhav

गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण पसरलं आहे. बाप्पा घरी आला म्हणजे घरात गोड लाडू, मोदक आणि पेढे असणारच. शिवाय प्रसादाला विविध पद्धतीचे पदार्थ देखील बनवले जातात. आता तुम्ही देखील तुमच्या घरी बाप्पा आल्याने सतत चमचमीत पदार्थ बनवत असाल. चमचमीत आणि तेलकट खाल्ल्याने काही मुलींना आणि मुलांना देखील चेहऱ्यावरील पिंपल्स वाढण्याची समस्या आणखी जास्त वाढेत.

आपला चोहरा खराब होऊ नये आणि पिंपल्स जास्त वाढूनयेत म्हणून काही जण असे चमचमीत पदार्थ खाणे टाळतात. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी गणेशोत्सवात मनसोक्त चमचमीत खाऊन त्वचेची काळजी कशी घ्यायची याची माहिती सांगणार आहोत.

अशी घ्या काळजी

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नयेत यासाठी काही स्किन केअर एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, गोड पदार्थ खाल्लाने रक्तात ग्लायकेशन प्रक्रिया होते. यामध्ये कोलेजन आणि इलास्टिन सुद्धा असते. त्यामुळे त्वचेसाठी पोषक असलेल्या नैसर्गिक पोषण तत्वांचा समतोल बिघडतो. यामुळे आहारात साखर खाण्याऐवजी तुम्ही गूळापासून तयार केलेल्या मिठाई खाऊ शकता.

त्वचा हायड्रेट ठेवा

पिंपल्स येण्याचे पहिले कारण म्हणजे तेलकट पदार्थ नाही तर डिहायड्रेशन आहे. त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्या. त्वचा हायड्रेट ठेवत राहा. त्यासाठी रात्री झोपताना पाणी पिऊन झोपा. शिवाय दिवसभर देखील जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. याने तुमची त्वचा जास्त चमकदार दिसेल.

स्किन केअरमध्ये तुम्हाला दिवसभर ७ ते ८ ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे. तहान लागत नसेल तरी देखील जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. घरच्याघरी दह्यात बेसन पीठ मिक्स करून हा पॅक चेहऱ्यावर अप्लाय करण्यास सुरुवात करा. शरीरात जास्त हिट असेल आणि पिंपल्स कमी होत नसतील तर एक ग्लास पाण्यात धने आणि खडीसाखर भिजवून या पाण्याचे सेवन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT