Skin Care tips, Skin Health, Skin care problem Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care tips : तुम्हालाही सतत चेहरा धुण्याची सवय आहे ? होऊ शकते चेहऱ्याला गंभीर नुकसान

त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉशचा दिनक्रम काय असावा, जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : त्वचा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी आपण दिवसातून अनेक वेळा तो सतत धुत राहतो. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी फेसवॉश चांगला मानला जातो, पण जास्त फेसवॉश केल्याने त्वचेचे नुकसानही होऊ शकते.

हे देखील पहा -

आपण दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा व किती वेळी चेहऱ्याला फेसवॉश लावयाला हवा हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. आपण सतत चेहऱ्या धुतल्यामुळे त्वचेवरील तेलकटपणा कमी झाल्यास त्वचेला नुकसान होते. वारंवार चेहरा स्वच्छ केल्यास त्वचेला कोरडेपणा, पुरळ उठणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तीनपेक्षा जास्त वेळा फेस वॉश केल्याने त्वचेची पीएच पातळी कमी होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि अस्वस्थ दिसते. त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉशचा दिनक्रम काय असावा, जाणून घेऊया.

१. आपली त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर दिवसातून दोन वेळा आपण फेस वॉश करायला हवा. कोरडी आणि संवेदनशील त्वचा नाजूक असते, त्यामुळे सकाळी कोमट पाण्याने (Water) आणि रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने फेसवॉश करावा. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग क्लीन्सर हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.

२. तेलकट आणि मुरुमे असणाऱ्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी फेसवॉश दिवसातून दोनदा पेक्षा जास्त वेळा वापरु नये. जास्त वेळा फेस वॉश केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. फेसवॉश मुरुमांसाठी कठीण असू शकते त्यासाठी आपण सौम्य किंवा आयुर्वेदिक फेसवॉशचा वापर करायला हवा. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी हायड्रॉक्सी अॅसिड असलेले क्लीन्सर वापरणे चांगले.

३. कॉम्बिनेशन स्किनला (Skin) जास्त काळजी लागत नाही. कॉम्बिनेशन स्किन असलेल्या लोकांनी दिवसातून एक ते दोन फेस वॉश करावे. कोणताही सौम्य फेसवॉश दिवसातून एकदा वापरवा. कॉम्बिनेशन स्किन लोक फोमिंग क्लीन्सर वापरू शकतात. हे त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचेला कोरडेपणापासून वाचवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

SCROLL FOR NEXT