Skin Care Routine, Night Routine Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Routine : झोपताना अशी घ्या त्वचेची काळजी, हेल्दी स्किनसाठी फॉलो करा या टिप्स

Skin Care Night Routine : त्वचेला दिवसापेक्षा रात्री स्वत:ला दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. सुंदर दिसण्यासासाठी आपण त्वचेसाठी अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादनाचा वापर करतो. त्यामुळे त्वचेवर मुरुमाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

बदलेली जीवनशैली, धूळ, प्रदूषण आणि वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. दिवसभराच्या थकव्यानंतर शरीर निस्तेज होते, त्याचप्रमाणे आपली त्वचा देखील रात्री निर्जीव होऊ लागते.

घराबाहेर पडताना त्वचेला (Skin) भरपूर घाण, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना करावा लागते. अशावेळी त्वचेला दिवसापेक्षा रात्री स्वत:ला दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. सुंदर दिसण्यासासाठी आपण त्वचेसाठी अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादनाचा वापर करतो. त्यामुळे त्वचेवर मुरुमाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

कितीही महागातली क्रिम लावा किंवा योग्य प्रकारे ट्रिटमेंट (Treatment) घ्या. त्वचा तेलकट तर होतेच पण त्याचबरोबर ती चिकटही होताना दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी त्वचेमध्ये रक्त प्रवाह चांगला होतो. ज्यामुळे त्वचेला स्वत:ला दुरुस्त करण्यासाठी चांगला वेळ (Time) मिळतो. रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी कशी घ्यायची? त्यासाठी या स्किन केअर रुटीन फॉलो करा.

  • रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. यासाठी तुम्ही मेकअप रिमूव्हर वापरु शकता. तसेच तेल बेस्ड रिमूव्हरचा वापर करु शकता. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.

  • क्लिन्सिंग ही नाईट स्किन केअर रुटीनची महत्त्वाची गोष्टी आहे. ज्यामध्ये तुमच्या त्वचेनुसार कोणतेही क्लीन्सर वापरु शकता. असे केल्याने छिद्र स्वच्छ होण्यास मदत होते.

  • झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर टोनरचा वापर करा. त्वचेसाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्टी आहे.

  • त्वचेवर सीरमचा वापर करा. यामुळे त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांशी लढण्यास मदत मिळते. त्वचेनुसार सीरम निवडा.

  • त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप गरजेचे आहे. त्वचेला मॉइश्चरायझेशन केल्याने खराब झालेली त्वचा दुरुस्त होऊ लागते. हे त्वचेला आवश्यक पोषक तत्व प्रदान करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

Cancer vaccine: कॅन्सरविरोधी लस प्रतिबंधनासाठी नव्हे, तर आजाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती

Dashavatar Collection: एकाच दिवशी 3 मराठी चित्रपट प्रदर्शित; 'दशावतार'ने मोडले कमाईचे रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा वाचून बसेल धक्का

भयंकर जलप्रलय! आभाळ फाटलं, ८ लोकं, दुकानं अन् जनावरं वाहून गेली, देहरादूनमधील ढगफुटीचा VIDEO समोर

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT