Skin Care Tips
Skin Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी या सोप्या टिप्सचा वापर करा

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. परंतु, चेहऱ्यावर मृत त्वचेच्या पेशी व अशुध्दींनी भरलेले असताना दिसणारा ब्लॅकहेड्स किंवा लहान पुरळ दिसू लागतात.

काळजी न घेतल्यास या त्रासदायक अडथळ्यांमुळे त्वचा काळी व निस्तेज दिसू लागते. म्हणूनच आपण त्वचेचा प्रकार समजून घेऊन आणि नंतर योग्य दिनचर्या पाळून ब्लॅकहेड्स दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. (Skin Care Tips In Marathi)

ब्लॅकहेड्सचा सामना करण्यासाठी आपण अनेक प्रयन्त करतो. त्यासाठी आपण चेहऱ्याला सगळ्यात महागड्या उत्पादनांचा वापर किंवा मेकअपची मदत घेऊन आापण चेहरा (Skin) स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.

तसेच ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय (Remedies) आपण करतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स निघून जाण्यास मदत होते परंतु, त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यासाठी काही गोष्टीची विशेष काळजी आपण घ्यायला हवी

आपल्याला त्वचेला स्वच्छ ठेवणे अंत्यत महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य फेस वॉश वापरून आपला चेहरा स्वच्ध धुवा याची खात्री करणे आवश्यक आहे. आपला मेकअप ऍप्लिकेटर देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे. टाळूच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे आणि आपल्या उशीचे कव्हर नियमितपणे बदलले पाहिजे. आपण ज्या डॉक्टरांचा सल्ला घेत असू त्यांच्याकडे देखील काही फेसवॉश असतात. ज्यामुळे आपल्या त्वचेच्या छिद्रांना खोलवर स्वच्छ करण्यात मदत करतात.

आपण चेहऱ्यासाठी साबण किंवा तेलकट अशा पदार्थांचा वापर करतो. त्यामुळे चेहरा कितीही स्वच्छ केला तरी तेलकटपणा कमी होत नाही. योग्य फेस वॉश वापरून आणि नियमितपणे चेहरा धुवून चेहऱ्यावर तयार होणाऱ्या ब्लॅकहेड्स रोखले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, सॅलिसिलिक ऍसिड वापरु शकतो.

तसेच रेटिनॉल, अॅडापॅलिन, नियासिनमाइड, व्हिटॅमिन सी, सॅलिसिलिक अॅसिड, बेंझॉयल पेरोक्साइड आणि एएचए आणि बीएचएसह फेस वॉश यासारखे घटकांमुळे ब्लॅकहेड्स टाळण्यास किंवा कमी करण्यास मदत करू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

SCROLL FOR NEXT