Swollen Kidney Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Swollen Kidney Symptoms: डोळ्यांखाली सतत सूज येत असेल तर समजा किडनीचं कार्य बिघडलंय; किडनीला सूज आल्यावर दिसून येतात 'ही' 6 लक्षणं

Signs of Kidney Not Functioning Properly: किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतो. जेव्हा किडनीचे कार्य बिघडते किंवा त्यात सूज येते तेव्हा शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात.

Surabhi Jayashree Jagdish
  • किडनीतील सूज शरीरात स्पष्ट संकेत देते

  • डोळ्यांखाली व पायात सूज दिसू शकते

  • लघवीच्या प्रमाणात बदल होऊ शकतो

आपल्या शरीरात कोणतेही बदल होत असतील तर त्याचे संकेत शरीर देत असतं. किडनीच्या आरोग्याबाबत देखील असंच आहे. किडनीच्या कार्यात थोडासाही बदल झाला तर त्याची लक्षणं शरीरावर दिसून येतात. त्याचप्रमाणे किडनीमध्ये सूज आली की शरीर अनेक प्रकारे संकेत देतं.

किडनीला सूज आल्यावर मिळणारी सुरुवातीची ही लक्षणं सामान्य थकवा किंवा किरकोळ त्रास वाटतात. पण प्रत्यक्षात ती गंभीर आरोग्य समस्येचे इशारे असू शकतात. किडनी हे शरीराचं फिल्टर असून ते रक्त शुद्ध करतं, टॉक्सिन घटक आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकतं. पण जेव्हा किडनीवर ताण वाढतो किंवा त्यात सूज येते, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो.

किडनीला सूज आल्यावर शरीरात दिसतात हे बदल

डोळ्यांखाली सूज

जर सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली सतत सूज दिसत असेल तर ती किडनीच्या कार्यात बिघाड असल्याचे संकेत असू शकतात. किडनी प्रोटीन योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे चेहऱ्यावर फुगवट्याचे प्रमाण वाढते.

पाय आणि टाचांमध्ये सूज

किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकू शकत नाही तेव्हा हे पाणी पाय आणि टाचांमध्ये साचू लागतं. ही स्थिती किडनीला सूज आल्याचं लक्षण असू शकतं.

वारंवार लघवी होणं

किडनीमध्ये सूज आल्यामुळे लघवीच्या प्रमाणात बदल होतो. अनेकदा व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागू शकतं. तर काही वेळा फारच कमी वेळा. दोन्ही स्थिती धोक्याचा इशारा आहेत. याशिवाय लघवीचा रंग गडद असेल तर तोही किडनीच्या समस्येचा संकेत असतो.

थकवा आणि अशक्तपणा

किडनी नीट काम करत नसल्यामुळे टॉक्सिन घटक रक्तात साचतात. त्यामुळे शरीर लवकर थकतं आणि अशक्तपणा जाणवतो आणि काम करण्याची क्षमता कमी होते.

भूक न लागणं

किडनीच्या सूजेमुळे रक्तात अपायकारक घटक साचतात, ज्यामुळे पोटाचे विकार होतात. भूक न लागणे, मळमळ किंवा उलटीची भावना ही किडनीच्या समस्येची लक्षणं असू शकतात.

श्वास घेण्यास त्रास

किडनीच्या सूजेमुळे शरीरात पाणी साचतं. अनेकदा हे पाणी फुफ्फुसांमध्येही भरू लागतं. ही स्थिती अत्यंत गंभीर असते. त्यामुळे अशावेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT