Liver Disease Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver Disease Symptoms: लिव्हर खराब होत असल्यास शरीरामध्ये दिसतात ६ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Signs of liver problems : यकृत हा मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. पचनक्रियेपासून ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्ये ते करते. यकृताचे कार्य बिघडल्यास किंवा त्याला काही प्रमाणात नुकसान झाल्यास शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. हा अवयव अन्नपचन, शरीरातील घातक पदार्थांचं विसर्जन, बाइल जूसचं उत्पादन आणि टॉक्सिन्स फिल्टर करण्याचं काम करतो. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य बिघडलं तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

आपल्या शरीरातील कोणताही अवयव खराब झाला किंवा योग्य पद्धतीने काम करत नसेल तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देतं. यावेळी तुमच्या शरीरात काही महत्त्वाचे आणि मोठे बदल दिसून येतात. लिव्हर खराब होत असेल तर शरीरात कोणते बदल दिसून येतात ते पाहूयात.

त्वचेला पिवळसरपणा येणं

लिव्हर खराब होत असल्यास त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. यावेळी त्वचेचा रंग पिवळसर दिसायला लागतो. मुळात हे जॉन्डिसचं लक्षण असू शकतं. पण ही अवस्था लिव्हरच्या बिघडलेल्या कार्यक्षमतेमुळेही उद्भवू शकते.

अंगाला सतत खाज येणं

लिव्हरच्या समस्यांमध्ये त्वचेचा रंग बदलण्यासोबतच तीव्र खाज जाणवण्याची तक्रारही अनेकदा केली जाते. त्यामुळे तुम्हाला हे लक्षण सतत दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा

रक्त न थांबणं

लिव्हर योग्यरित्या कार्यरत नसेल, तर तुमच्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्यामध्ये समस्या येतात. यावेळी किरकोळ जखम देखील गंभीर ठरू शकते. अशावेळी एखादी जखम झाल्यास रक्त थांबत नाही.

प्रचंड थकवा जाणवणं

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे देखील तुमच्या लिव्हर फेल होण्याचं सुरुवातीचं लक्षण ठरू मानलं जातं. याचं कारण म्हणजे लिव्हर योग्यरित्या डिटॉक्स होत नाही. आणि शरीरावर त्याचा परिणाम होतो.

भूक मंदावणं

लिव्हरवर ताण आल्यानंतर त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे व्यक्तीला भूक देखील लागत नाही. याशिवाय खाण्याची इच्छा कमी होते.

उलटी आणि मळमळ

लिव्हरच्या काही समस्या असल्यास तुम्हाला अनेकदा मळमळ वाटू शकते. यावेळी काही वेळा मळमळ वाटू शकते मात्र प्रत्यक्षात उलटी होत नाही. ही भावना कायम राहिल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

SCROLL FOR NEXT