Side Effects Of Using Phone In Toilet saam tv
लाईफस्टाईल

Health news: सावधान ! तासनतास टॉयलेट सीटवर फोन घेऊन बसताय? मूळव्याधासह 'या' समस्या लागतील मागे

Side Effects Of Using Phone In Toilet: टॉयलेट सीट बसून फोनचा वापर करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टॉयलेट सीटवर जास्त वेळ मोबाईल फोन वापरल्याने मूळव्याध आणि गुदद्वारासंबंधीचा फिस्टुला सारख्या समस्या वाढू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्याच्या काळात मोबाईल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या हातात फोन असतो. आपलं बरंच काम देखील मोबाईलवर असतं. काहीजण अगदी शौचाला जाताना देखील फोन वॉशरूममध्ये घेऊन जातात. कदाचित तुम्हीही असं करत असाल. जर तुम्हाला देखील ही सवय असेल तर थांबा. याचं कारण म्हणजे टॉयलेट सीट बसून फोनचा वापर करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतंय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टॉयलेट सीटवर जास्त वेळ मोबाईल फोन वापरल्याने मूळव्याध आणि गुदद्वारासंबंधीचा फिस्टुला सारख्या समस्या वाढू शकतात. तज्ज्ञांनी यावेळी शौचालयात फोनचा जास्त वापर आणि बैठी जीवनशैली यांच्यातील संबंधाबद्दल चिंता व्यक्त केली. शहरी भागांमध्ये ही समस्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणं का हानिकारक?

तज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये फोन वापरताना व्यक्ती बराच वेळ टॉयलेट सीटवर बसते, ज्यामुळे गुदाशयाच्या भागावर जास्त दबाव येतो. सततच्या या सवयीमुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि गुदद्वारासंबंधीचा फिस्टुला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

जीवनशैली ठरतेय का कारणीभूत?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एका वर्षात रुग्णालयामध्ये मूळव्याध आणि फिस्टुलाचे ५०० हून अधिक रुग्ण येतात. कमी पाणी पिणं, जंक फूडचं जास्त सेवन आणि शौचालयात जास्त वेळ घालवणं यांसारख्या वाईट जीवनशैलीच्या सवयी या समस्यांची मुख्य कारणं आहेत.

मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी अ‍ॅब्लेशनसारख्या कमीत कमी आक्रमक प्रोसेसची डॉक्टर शिफारस करतात. या प्रक्रियेअंतर्गत, रुग्णाला त्याच दिवशी आराम मिळतो आणि रुग्णालयातून देखील लगेच डिस्चार्ज मिळू शकतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे फोन घेऊन जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसणं टाळावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT